19.1 C
New York

Porsche Accident : विशाल अग्रवालला छत्रपती संभाजीनगरमधून अटक

Published:

 
पुणे : पुण्यात परवा रात्री मद्यधुंद अवस्थेत कार (Porsche Accident) चालवून दोघांना चिरडल्याप्रकरणी अल्पवयीन मुलाचे फरारी वडील बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्याबद्दल तसेच मुलगा अल्पवयीन असतानाही त्याला पार्टी करण्यास परवानगी दिल्याबद्दल त्यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. अग्रवाल हे पुण्यातील ब्रह्मा कॉर्प या बांधकाम उद्योग समुहाचे प्रमुख आहेत.

अल्पवयीन मुलाला कार चालवायला दिल्याबद्दल गुन्हा दाखल झाल्याचे समजताच विशाल अग्रवाल फरारी झाले होते. पुणे पोलिसांनी मंगळवारी त्यांना संभाजीनगरमधून एका हॉटेलमधून ताब्यात घेतले. त्यानंतर पुण्यात त्यांना अटक करण्यात आली. बुधवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

Porsche Accident : पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

या अपघातानंतर पोलिसांनी या मुलाच्या बचावासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे पोलीस खात्यासह गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यामुळे फडणवीस यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. मंगळवारी फडणवीस यांनी पुण्यात येऊन पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यामध्ये पब, नाईट क्लबबाबत कठोर नियमावली तयार करण्याचे आदेश फडणवीस यांनी दिले. कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारण्याचे संकेत फडणवीसांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही मंगळवारी पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना फोन करून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. कोणालाही पाठीशी न घालता किंवा राजकीय दबावाला बळी न पडता कठोर कारवाईचे आदेश मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले.

हेही वाचा : मुंबईतील संथ मतदानाच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांकडून आदेश

Porsche Accident : न्यायालयीन चौकशी करा : वडेट्टीवार

दरम्यान, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबधित मुलगा मद्यपान करून बारमधून बाहेर पडतानाचे सीसीटीव्ही फुटेज असताना पुणे पोलिसांनी मात्र त्याची अल्कोहोल चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल दिला आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असल्याचे विजय वडेट्टीवार म्हणाले. पोलिसांवर कोणाचा दबाव होता, याचीही चौकशी करावी, अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img