सिंधुदुर्ग
लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) निकाल 4 जून रोजी लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला (Mahayuti) 45 पेक्षा अधिक जागा मिळणार आहे. त्यामुळे निकालानंतर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) लंडनला पळून जाणार असल्याने त्यांचा पासपोर्ट (Passport) जप्त करण्यात यावा असे भाजपचे नेते आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उद्धव ठाकरेंवर प्रसारमाध्यमांशी बोलताना हल्लाबोल केला आहे.
ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करा
नितेश राणे म्हणाले की, साधी सरपंच पदाची निवडणूक न लढविलेला संजय राऊत निवडणुकीवर बोलतात आणि त्याचा उद्धव ठाकरे शेमड्यासारखे रडताना दिसले. उद्धव ठाकरेंचा चेहरा बघितल्यानंतर पराभव म्हणजे नेमकं काय? हे समजतं. उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद आणि राऊतांच रड गाऱ्हाणं बघून पुन्हा मोदी येणार हे समजलं. ठाकरे कुटुंबाचे पासपोर्ट जप्त करावेत, 4 जूननंतर ते कुटुंब लंडनला पाळण्याच्या तयारीत आहे.
महायुती 45 चा आकडा गाठतेय
नितेश राणे म्हणाले की, राज्यातील कालच्या मतदानानुसार महायुतीला मनापासून स्विकारलं आहे, हे दिसून आलं. आमचे उमेदवार घासून नाही ठासून येतात. महायुती 45 चा आकडा गाठतेय. ज्यांनी आयुष्यात एक निवडणूक लढवली नाही. मतदान कस मिळवायचं? हे माहीत नसेल, तो मतदानाची पद्धत शिकवत असेल, तर लाजिरवाणी गोष्ट आहे. गल्लीतल्या तीनपट लोकांना मतदानाचा काही माहीत नसेल, महाराष्ट्राच्या जनतेनं मशाल विजवून टाकली आहे असं नितेश राणे म्हणाले.