26.2 C
New York

Kalyan Loksabha : कल्याणमध्ये 9 लाख मतदारना बजावला हक्क

Published:

शंकर जाधव, डोंबिवली

सोमवारी पार पडलेल्या कल्याण लोकसभा (Kalyan Loksabha) निवडणुकीच्या मतदानात ४७.०८. टक्के मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मागील २०१९ च्या झालेल्या मतदाना पेक्षा २०२४ च्या निवडणुकीच्या (Election) मतदानात केवळ ०.९२ टक्के म्हणजेच १ टक्काने वाढ झालेली दिसून आली. सर्वात जास्त मतदान कल्याण पूर्व विधान सभा क्षेत्रातून ५०.०१ टक्के झाले. तर सर्वात कमी मतदान उल्हासनगर विधान सभा क्षेत्रातून ४५.१२ टक्के इतके झाले असल्याची माहिती निवडणूक विभाग कडून मिळाली आहे.

मागील २०१९ सालच्या कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत ४६.१६.टक्के मतदान झाले होते. कल्याण लोकसभेतील ९ लाख ८० हजार ३०९ मतदान केल्याने मतदानाची आकडेवारी ४७.०८ टक्के इतकी झाल्याने गत २०१९ सालाच्या लोकसभा निवडणूक पेक्षा केवळ ०.९२ टक्के इतकीच वाढ झाली आहे.

कल्याण लोकसभा मतदार संघातील अंबरनाथ,उल्हास नगर,कल्याण पूर्व,डोंबिवली ,कल्याण ग्रामीण व कळवा मुंब्रा या सहा विधानसभा क्षेत्रातील मिळून एकूण २० लाख ८२ हजार २२१ मतदार संख्या आहे.सोमवारी झालेल्या मतदानात अंबरनाथ विधान सभा क्षेत्रातील एकूण ३ लाख ५३ हजार ५५४ मतदारां पैकी १ लाख ६१ हजार ९६३ मतदारानी ४५..८१ ट क्के मतदान केले तर उल्हासनगर विधान सभा क्षेत्रातील एकूण २ लाख ५७ हजार ३६७ मतदारां पैकी १ लाख १६ हजार १२३ मतदारांनी ४५.१२ ट क्के मतदान केले.

कल्याण पूर्व विधान सभा क्षेत्रातील एकूण २ लाख ९९ हजार ३८० मतदारां पैकी १ लाख ४९ हजार ७१९ मतदारांनी ५०.०१ टक्के मतदान केले. डोंबिवली विधान सभा क्षेत्रातील एकूण २ लाख ७५ हजार ११० मतदारां पैकी १ लाख ३० हजार ७२ मतदारांनी ४७.२८ टक्के मतदान केले. कल्याण ग्रामीण विधान सभा क्षेत्रातील एकूण ४ लाख ५३ हजार १४९ मतदारां पैकी २ लाख १३ हजार ११५ मतदारांनी ४७.२८ टक्के मतदान केले.कळवा मुंब्रा विधान सभा क्षेत्रातील एकूण ४ लाख ४३ हजार ६६१ मतदारां पैकी २ लाख ४ हजार ३५० मतदारांनी ४६.०६ टक्के मतदान केले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img