21 C
New York

Artificial Intelligence : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ऐंशी टक्के नोकऱ्या धोक्यात …

Published:

तंत्रज्ञानामुळे मागच्या पंधरा वर्षात मानवाने आजवरचा सर्वोच्च विकास गाठला आहे. पण, कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे Artificial Intelligence नवनवीन तंत्रज्ञान उदयास येत आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता एकीकडे माणसाचे जगणे सुसह्य करत असताना दुसरीकडे मात्र त्याचे मोठे तोटेही समोर येत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सध्याच्या जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के नोकऱ्या संपतील, अशी भीती व्यक्त केली जातेय.

तंत्रज्ञानात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराने मानवी जीवनाचा वेग वाढला आहे. शिवाय औद्योगिक उत्पादकता वाढवण्यात, पर्यायाने जागतिक विकासाला वेग देण्यासाठी चांगल्या संधी निर्माण होत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे सध्याच्या नोकऱ्या जाण्याचा धोका असला तरी नवे रोजगार निर्माण होतील, असेही सांगितले जात आहे. तंत्रज्ञानामध्ये भाषा आणि मजकूर समजून घेण्यात AI प्रणाली अधिक चांगल्या प्रकारे काम करताना दिसत आहे.

त्यामुळे ट्रान्सक्रिप्शनिस्ट, टेलिमार्केटर आणि काही कॉल सेंटरमधील कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या लक्षणीयरीत्या कमी होताना दिसत आहेत. येत्या काही वर्षांत आणखी चांगले तंत्रज्ञान, उत्पादने बाजारात येण्याची शक्यता आहे. वकील, शिक्षक, वित्तीय सल्लागार आणि आर्किटेक्ट अशा विविध क्षेत्रांत तज्ज्ञ असलेल्यांनाही येत्या काळात स्वतःमध्ये तंत्रज्ञानाप्रमाणे बदल घडवावे लागतील.

जपानने कोलकात्यावर का टाकले होते मध्यरात्री बॉम्ब?

येत्या काळात नोकरी करण्याच्या पद्धतीमध्येदेखील बदल घडण्याची शक्यता आहे. दशकभरात एआयमुळे अनेकांना नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेतच, पण त्याचा सर्वाधिक फटका पुरुष वर्गापेक्षा महिलांना अधिक बसणार आहे. ग्राहक सेवा, विक्री सहकार्य आणि खाद्यपदार्थ सेवा अशा क्षेत्रात महिलांची संख्या जास्त असल्याने त्याचा फटका महिलांना अधिक बसणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img