20.6 C
New York

Hsc Result : बारावीत मुलीच हुशार, राज्याचा निकाल ९३.३७ टक्के, कोकण विभाग ठरला अव्वल

Published:

मुंबई

राज्यातील बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक मंडळाने (Maharashtra Board 12th Result) बारावीचा निकाल (Hsc Result) जाहीर केला आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा कोकणने विभागानं आपला रेकॉर्ड कायम ठेवला आहे. कोकण विभागाचा निकाल 97.91 तब्बल टक्के लागला आहे. तर मुंबई सर्वात तळाशी आहे. मुंबईचा निकाल 91.95 टक्के लागला आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या (Maharashtra board result) वेबसाईटवर हा निकाल दुपारी 1 पासून विद्यार्थ्यांना लाईव्ह बघता येणार आहे.

बारावीचा निकाल 93.37 टक्के लागला आहे. राज्यात 9 विभागीय मंडळ मार्फत परीक्षा घेण्यात आली होती. एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांना परीक्षा दिली होती. 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी पास झाले. यंदा देखील मुलींनीच बाजी मारली आहे. तर 26 विषयांचा निकाल हा 100 टक्के लागला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा 2.12 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

कुठल्या विभागाचा निकाल किती टक्के

कोकण 97.51 टक्के
नाशिक 94.71 टक्के
पुणे 94.44 टक्के
कोल्हापूर 94.24 टक्के
संभाजी नगर 94.08 टक्के
अमरावती 93 टक्के
लातूर 92.36
नागपूर 92.12 टक्के
मुंबई 91.95
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल ऑनलाईन जाहीर केला जाणार आहे. निकाल बघण्यासाठी शिक्षण मंडळाच्या www.mahresult.nic.in या अधिकृत संकेतस्थळाचा किंवा इतर वेबसाईटचा वापर करता येईल.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img