मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) राज्यातील अंतिम आणि देशातील पाचव्या (Loksabha) टप्प्यातील मतदान काल सोमवार रोजी पार पडले. पाचवा टप्प्यात (Fifth Polling) मतदान संथगतीने होत असल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला होता. मुंबईतील मतदान (Mumbai Election) केंद्रावर लांबच लांब मतदारांच्या रांगा दिसत होत्या. आता या संथगतीने झालेल्या मतदानाची चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मुख्य सचिव यांना दिले आहे.
राज्यातील पाचव्या टप्यात मतादानाची टक्केवारी घटली त्यामागे मतदान प्रक्रियेतील संथपणा कारणीभूत होता का? याच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मतदान प्रक्रियेदरम्यान आलेल्या अनेक तक्रारींची गंभीर दखल घेतली. मतदानावेळी वृद्ध मतदारांना रांगेचा आणि कडक उन्हाचा मतदारांना झालेला त्रास त्यामुळं मतदानावर झालेला परिणाम याचाही तपास केला जाणार आहे.
पाचव्या टप्यातील मतदान प्रक्रियेची प्रशासनानं पुरेसी काळजी घेतली नव्हती का? मतदान टक्केवारी कमी का झाली? प्रशासन कुठे कमी पडले? याची तात्काळ चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश.