21 C
New York

Cannes 2024 : २० किलो च्या गाऊन वर थिरकली नॅन्सी त्यागी.. कोण आहे ही नॅन्सी त्यागी?

Published:

Cannes Film Festival 2024 : सोशल मीडियावर सध्या कान्स फिल्म फेस्टिवल (Cannes Film Festival) सोहळ्याची जोरदार चर्चा सुरु आहे. कान्स फिल्म फेस्टिवलमधील फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळतंय. तर यातच एक रील स्टार (Reel Star) असलेल्या व्हायरल होणाऱ्या फोटोंनी फॅशन इंडस्ट्रीत खळबळ उडवून दिली आहे. चला तर मग जाणून घेऊया आहे तरी कोण ती…

cannes film festival 2024 ची चर्चा सगळीकडेच पाहायला मिळतेय. सर्वात मोठं-मोठे सेलिब्रिटी रेड कार्पेटवर आपल्या अदा दाखवताना दिसत आहेत. वेगवेगळ्या फॅशन सेन्सने संपूर्ण जगाला वेड लावल्याचं दिसतंय. बॉलीवूडमधील ऐश्वर्या राय,(Aishwarya Rai) कियारा अडवाणी,(Kiara advani) उर्वशी रौतेला,(Urvashi Rautela) आणि आलिया भट (Alia Bhatt) या अभिनेत्रींनी आपल्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. तर अशातच आता रेड कार्पेटवर आपल्या अदाकारीने सर्व उपस्थितांचे लक्ष वेधून घेणारी एक रील स्टार सर्वांच्याच नजरे आली.

’रामायण’ चित्रपटाचे किती भाग होणार प्रदर्शित? दिग्दर्शकांनी केला मोठा खुलासा…

Cannes 2024 : छोट्याशा गावात राहते नॅन्सी


उत्तरप्रदेशमध्ये (Uttar Pradesh) राहणारी इन्फ्ल्युएन्सर (Influencer) नॅन्सी त्यागीने (Nancy Tyagi) आपल्या फॅशन सेन्समुळे सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. नॅन्सीने स्वतःच्या हाताने शिवलेला ड्रेस पाहून सर्वच थक्क झाले आहेत. नॅन्सीने शिवलेल्या गाऊन चे वजन २० किलो (20KG) असल्याचं म्हंटल जातंय. स्वतः नॅन्सी ने याबाबतची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत खुलासा केला आहे. उत्तर पप्रदेशमधील बरनवा (Barnava) ह्या एका छोट्याशा गावातील तरुणीने अनेकांसमोर आपला आदर्श निर्माण केला. नॅन्सीचा कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ पर्यंत पोहोचण्याचा प्रवास खूपच प्रेरणादायी आहे.

Cannes 2024 : २० किलोच्या गाऊनची सर्वत्र चर्चा

७७ व्या कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ मध्ये नॅन्सीने स्वतःच्या हाताने बनवलेला २० किलो चा गाऊन (Gown) परिधान करून तिने रेड कार्पेटवर एंट्री केली. नॅन्सीने गुलाबी रंगाचा गाऊन शिवला ज्याला तयार करण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी लागला, असं तिने म्हटलंय. १००० मीटर कापडाचा वापर करून नॅन्सीने भला मोठा हेवी गाऊन तयार केला आहे. याबद्धल नॅन्सीने फिल्म फेस्टिवल मध्ये संवाद साधला. या संवादात नॅन्सी म्हणाली की, “माझा प्रवास सोपा नव्हता. ह्या प्रवासातील प्रत्येक क्षण माझ्यासाठी अविस्मरणीय होता. तुमच्या सर्वांचं माझ्याबद्धल असलेलं प्रेम आणि मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्या बद्धल मी तुमची खूप आभारी आहे”.

Cannes 2024 : सोशल मीडियाची कमाल

नॅन्सीने १२ वी पर्यंत शिक्षण पूर्ण करून पुढच्या शिक्षणासाठी ती दिल्लीला पोहोचली. कोविड-१९ च्या दरम्यान कोणतंही साधन हाती नसल्यामुळे नॅन्सीची आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळून गेली होती. तरीही नॅन्सीने कधीच हार मानली नाही. जे संकट समोर येईल त्याच्याशी ती लढत राहिली. हाती काहीच नसल्यामुळे नॅन्सीने शिवणकाम करायला सुरुवात केली. नॅन्सीने सोशल मिडियाचा पुरेपूर वापर करून आपल्या कौशल्याला कल्पकतेची जोड दिली आहे. स्वतः तयार केलेले कपड्यांचे व्हिडीओ नॅन्सी सोशल मीडियावर पोस्ट करू लागली. तिच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या. पोस्ट केलेल्या व्हिडीओला नेटकऱ्यांचा चांगला प्रतिसाद तिला मिळू लागला. नॅन्सी स्केचपासून ते आऊटफिट पूर्ण होई पर्यंतचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करायची. एक उत्तम आणि प्रसिद्ध असलेली फॅशन इनफ्ल्यूएन्सर (nfluencer) अशी सोशल मीडियावर नॅन्सीची ओळख आहे. तर आता नॅन्सी त्यागी ही कान्स फिल्म फेस्टिवलची सर्वत्र प्रसिद्ध ठरलेली इनफ्ल्यूएन्सर आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img