26.6 C
New York

Bigg Boss Marathi: ‘हा’ अभिनेता करणार ‘बिग बॉस मराठी ५’च होस्टिंग…

Published:

छोट्या पडद्यावर सर्वात गाजणारा आणि लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो म्हणून ‘बिग बॉस’मराठीला (Bigg Boss Marathi) ओळखलं जातं. गेल्या काही वर्षांपासून हा कार्यक्रम प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करत आहे. आतापर्यंत ‘बिग बॉस मराठी’चे चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. चौथा सीझन संपल्यापासून प्रेक्षक पाचव्या सीझनची प्रतीक्षा करत आहेत. आता ‘बिग बॉस मराठी 5’ संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.


लवकरच ‘बिग बॉस मराठी 5’ कलर्स मराठी वाहिनीवर सुरु होणार असून या सिझनमध्ये एक ट्विस्ट आहे. फक्त यावेळी होस्ट म्हणून महेश मांजरेकरांच्या ऐवजी एका नव्या अभिनेत्याची वर्णी लागली आहे. हिंदीसह मराठीसिनेसृष्ठीत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता, दिग्दर्शक, निर्माता रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) हा कार्यक्रम होस्ट करणार आहे.

शेखर सुमनच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे खळबळ…

संपूर्ण महाराष्ट्र जवळपास दोन वर्षे ज्या शोची आतुरतेने वाट पाहात होता, त्याची घोषणा अखेर कलर्स मराठी आणि JioCinema वर करण्यात आलेली आहे. लवकरच ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतु, यावेळी या कार्यक्रमाचं होस्टिंग महेश मांजरेकर करणार नसून वाहिनीवरून शेअर केलेल्या नव्या प्रोमोमध्ये यंदा बिग बॉसचं होस्टिंग रितेश देशमुख करणार आहे.


नवा सिझन लवकरच नव्या सरप्राईजसह प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. कलर्स मराठीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर “बिग बॉस मराठी” चा व्हिडिओ शेअर केला आला असून त्यामध्ये ‘बिग बॉस’चा डोळा त्याच सोबत बॅालीवूडचा स्टयलिश हिरो आणि महाराष्ट्राचा मराठमोळा मुलगा सुपरस्टार रितेश देशमुख देखील दिसत आहे. या सिझनमध्ये एक्स्ट्रा धमाल, एक्स्ट्रा मस्ती, एक्स्ट्रा गॅासिप्स, एक्स्ट्रा मसाला आणि एक्स्ट्रा भव्यता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img