4.1 C
New York

Ajit Pawar : अजितदादांनी बोलवले आमदारांची बैठक

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीनंतर (Loksabha Elections) अजित पवार गट (Ajit Pawar) कामाला लागला आहे. 27 तारखेला बोलावली पक्षाच्या सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. बैठकीत लोकसभा मतदानासंदर्भात चर्चा केली जाणार आहे. मुंबईत गरवारे क्लब इथं पक्ष बैठकीचं आयोजन केलं आहे. मित्रपक्षांचं सहकार्य आणि राज्यातल्या मतदानाबाबत चर्चा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, या बैठकीत विधानसभा निवडणुकीवरही चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राष्ट्रवादी कुणाची? पक्षाचं चिन्ह कुणाचं? यावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या केसचा निकाल कधीही येऊ शकतो. त्यामुळे निकाल बाजूने आल्यास आणि विरोधात गेल्यास काय करता येईल? याची चर्चाही या बैठकीत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल आल्यानंतर विधानसभा निवडणुकीला कशा पद्धतीने सामोरे जायचं याचा ऊहापोह या बैठकीत होणार असल्याचं बोललं जात आहे.

अजितदादा गटाने बोलावलेल्या या बैठकीला पक्षाचे अनेक वरिष्ठ नेतेही उपस्थित राहण्याची शक्यता आहे. स्वत: अजितदादा या बैठकीला संबोधित करणार असल्याचं सांगितलं जात आहे. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा होणार आहे. निकालानंतर जो रिझल्ट येईल, त्यानंतर काय रणनीती आखायची हे या बैठकीत ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. शरद पवार गटाला अधिक जागा मिळाल्यानंतर राज्यातील राजकीय परिस्थिती काय होऊ शकते? यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता असल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच, महायुतीतल्या घटकपक्षांनी मतदानात मदत केलं की नाही? याचीही चर्चा या बैठकीत केली जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img