बॉलीवूड अभिनेत्री यामी गौतम (Yami Gautam) आणि चित्रपट निर्माता आदित्य धर (Aditya Dhar) यांनी सोमवारी (२० मे) रोजी आनंदाची बातमी दिली. त्यांना पुत्ररत्न प्राप्त झाल्याची घोषणा केली. सोशल मीडियावर फोटो पोस्ट करत त्यांनी चाहत्यांना आनंदाची बातमी दिली. 10 मे रोजी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर त्यांना मुलगा झाला. यामी-आदित्यने मुलाचे नाव वेदविद ठेवले आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत या जोडप्याने लिहिले,”अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आमच्या लाडक्या मुलाच्या, वेदविदच्या आगमनाची घोषणा करताना आम्हाला आनंद होत आहे. कृपया सर्वांनी त्याला भरपूर प्रेम आणि आशीर्वाद द्या.” त्यांनी डॉक्टरांचे देखील आभार मानले. त्यांनी पोस्टच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले की, “आम्ही सूर्या हॉस्पिटलमधील वैद्यकीय व्यावसायिकांचे, विशेषत: डॉ. भूपेंद्र अवस्थी आणि डॉ. रंजना धनू यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो, ज्यांच्या कौशल्याने आणि अथक प्रयत्नांमुळे हा आनंदाचा प्रसंग शक्य झाला.”
बॉलीवूडमधील ‘हे’ कलाकार बजावत नाही मतदानाचा हक्क! कारण…
पुढे असे लिहिले आहे की, “आम्ही पालकत्वाच्या या सुंदर प्रवासाची सुरुवात करत असताना, आमच्या मुलाच्या उज्ज्वल भविष्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.” यामी आणि आदित्यने फेब्रुवारी 2024 मध्ये ‘कलम 370’ या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमादरम्यान प्रेग्नेंसीची घोषणा केली होती. प्रेग्नेंसीची घोषणा करण्यापूर्वी, यामी तिच्या मोठ्या आकाराच्या ब्लेझरने तिचा बेबी बंप लपवताना दिसली. कार्यक्रमात आदित्य देखील तिचा हात धरून तिला स्टेजवर पोहोचण्यास मदत करताना दिसला होता.
जून 2021 मध्ये यामी-आदित्य लग्नबंधनात अडकले. त्याअगोदर त्यांनी त्यांचे नाते लपवून ठेवले होते. हिमाचल प्रदेशमध्ये पारंपरिकरित्या लग्न करून त्यांनी चाहत्यांना आश्चर्यचकित केले होते. दरम्यान यामी ‘कलम ३७०’ मध्ये झळकली होती. तिने या चित्रपटात गुप्तचर अधिकारीची भूमिका साकारली होती. हा चित्रपट एक आकर्षक ॲक्शन पॉलिटिकल ड्रामा आहे. याचे दिग्दर्शन दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदित्य सुहास जांभळे यांनी केले आहे.