10.4 C
New York

Gautam Gambhir : गौतम गंभीर बीसीसीआयची ही ऑफर स्वीकारणार का?

Published:

काहीच दिवसांपूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाच्या पुरुष सिनियर टीमसाठी नवीन मुख्य प्रशिक्षक (हेड कोच) नेमण्याबाबत अर्ज पाठवण्याची मागणी केली होती. त्यासाठी बीसीसीआयने आतापासूनच शोधाशोध सुरु केली आहे. कारण टी20 वर्ल्डकपमध्ये काहीही निकाल लागला तरी प्रशिक्षकपदाची जागा भरणं गरजेचं आहे. दु बासीसीआयने (BCCI) गौतम गंभीरला (Gautam Gambhir) 2024 च्या टी-20 विश्वचषकानंतर (T20 World Cup 2024) टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकाची (Team India Head Coach) जबाबदारी स्वीकारण्याची ऑफर दिली आहे.

राहुल द्रविडनंतर भारतीय संघाला शिकवणी देण्यासाठी प्रशिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे. त्यासाठी बीसीसीआयने अर्ज मागितले आहेत. न्यूझीलंडचा दिग्गज स्टिफन प्लेमिंग आणि रिकी पाँटिंग यांना दावेदार मानले जात आहे. बीसीसीआयकडून गौतम गंभीर याला टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी ऑफर देण्यात आली आहे. पण गौतम गंभीर ही ऑफर स्वीकारणार का? हे पाहावं लागेल. राहुल द्रविड याचा कार्यकाळ टी20 विश्वचषकानंतर संपुष्टात येत आहे.

क्रिकेट प्रेमींना भारत पाकिस्तान सामन्याची क्रेझ

Gautam Gambhir गौतम गंभीरकडे कोचिंगचा अनुभव नाही –

आंतरराष्ट्रीय अथवा देशांतर्गत क्रिकेटमध्ये कोचिंगचा गौतम गंभीर याच्याकडे कोणताही अनुभव नाही. गौतम गंभीर लखनौ सुपर जायंट्स संघाचा 2022-2023 आयपीएल हंगामातमेंटॉर होता. लखनौची कामगिरी शानदार झाली होती. यंदाच्या हंगामात तो कोलकाता नाईट रायडर्सच्या ताफात्यात आहे. गौतम गंभीर मेंटॉर असताना लखनौ संघ दोन वर्षे प्लेऑफमध्ये दाखल झाला होता. यंदा कोलकाताने प्लेऑफमधील स्थान निश्चित केले आहे. सध्या कोलकाता संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर विराजमान आहे.

Gautam Gambhir गंभीर होऊ शकतो मुख्य प्रशिक्षक?

दरम्यान, गौतम गंभीरने मुख्य प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारावी अशी बीसीसीआयची इच्छा असल्याचे ईएसपीएन क्रिकइन्फोच्या अहवालातून समोर आले आहे. वास्तविक, गंभीर सध्या आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचा मेंटार आहे. त्याच्या मार्गदर्शनाखाली कोलकाता या मोसमात प्लेऑफसाठी पात्र ठरला आहे. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील संघ प्लेऑफमध्ये पोहोचणारा पहिला संघ आहे. याआधी गंभीर लखनऊ सुपर जायंट्सशी संबंधित होता. दोन वर्षे ते या संघाचे मार्गदर्शक राहिले. मात्र, तो आयपीएल 2024 मध्ये कोलकातामध्ये परतला.

Gautam Gambhir तिन्ही फॉरमॅटमध्ये असेल एकच प्रशिक्षक

बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी अलीकडेच, स्पष्ट केले होते की, प्रशिक्षक हा वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा असणार नाही. अशा परिस्थितीत तिन्ही फॉरमॅटसाठी एकाच प्रशिक्षकाचा शोध असेल, जो 3.5 वर्षांसाठी भारतीय क्रिकेट संघाची जबाबदारी सांभाळेल. टी-20 विश्वचषकानंतर द्रविडचा कार्यकाळ संपत आहे. मुख्य प्रशिक्षकपदावर राहण्यासाठीही त्यांना अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख बीसीसीआयने 2७ मे ठेवली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img