लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha elections) पाचव्या टप्प्यासाठी आज 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होत आहे. राज्यात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी अवघे 15. 93 टक्के मतदान झाले. मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघाशिवाय, नाशिक, दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि धुळे या सहा लोकसभा मतदारसंघात (Maharashtra Lok Sabha Election) मतदान होत आहे. सकाळी सात वाजत मतदान सुरू झालं.
Lok Sabha elections दिंडोरी, पालघरमध्ये मतदानाची आघाडी, कल्याणमध्ये मात्र सर्वात कमी
राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान आज, 20 मे रोजी होत आहे. राज्यातील 13 मतदारसंघात सकाळी सात वाजल्यापासून मतदानाची प्रक्रिया सुरु झाली आहे. पाचव्या टप्प्यातील एकूण 13 मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत सरासरी अवघे 15. 93 टक्के मतदान झाले. विशेष म्हणजे दिंडोरी मतदारसंघानंतर पालघर मतदारसंघात मतदानाची टक्केवारी उर्वरित मतदारसंघाच्या तुलनेत जास्त आहे. पालघरच्या अनेक दुर्गम आणि ग्रामीण भागात मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असून तलासरी तालुक्यातील कवाडा येथील मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात मतदारांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत.
राज्यात 11 पर्यंत 15.93 टक्के मतदान
गेले काही दिवसांपासून तापमानाचा पारा वाढत असल्यामुळे ग्रामीण भागातील मतदार सकाळच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मतदानाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच मतदान केंद्रावर पालघर विधानसभेचे आमदार श्रीनिवास वनगा यांनीही आपल्या कुटुंबासह मतदान केलं. मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व स्थरातील यंत्रणा गेल्या महिन्याभरपासून कसोशीचे प्रयत्न करत आहे. अशातच आगामी काळात मतदानाची टक्केवारी वाढेल अशी अपेक्षा आहे.
Lok Sabha elections एकूण 13 लोकसभा मतदारसंघात सकाळी 11 वाजेपर्यंत झालेली मतदानाची टक्केवारी
धुळे- 17.35 टक्के
दिंडोरी- 19.50 टक्के
नाशिक – 16.3 0 टक्के
पालघर- 18.60 टक्के
भिवंडी- 14.79 टक्के
कल्याण -11.46 टक्के
ठाणे – 14.86 टक्के
मुंबई उत्तर – 14.71 टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – 17.53 टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – 17.01 टक्के
मुंबई उत्तर – मध्य – 15.73 टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- 16.69 टक्के
मुंबई दक्षिण – 12.75 टक्के