मुंबई
लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यात आज मुंबईसह राज्यात 13 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक पार पडली आहे. मतदान केंद्रावर संथगतीने करण्यात येत असल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगाने (Election Commission) भाजप (BJP) हल्लाबोल केला होता. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू झालं, पराभव समोर दिसत असल्याने मोदींवर त्यांनी टीका केल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विरोधकांना मतदान होऊ नये यासाठी मतदान केंद्रावर विलंब लागत असल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला होता असं म्हणत ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले
मुंबईत संथ गतीने मतदान होत असल्याची तक्रार सर्वप्रथम आम्हीच आयोगाकडे केली. आता मात्र, नेहमीप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी त्यांचे रडगाणे सुरु केले आहे. पराभव समोर स्पष्ट दिसत असताना त्यांनी सवयीप्रमाणे मोदीजींवर आरोप करणे प्रारंभ केले आहे. 4 जूननंतरच्या स्थितीला सामोरे जाण्याची पार्श्वभूमी ते आताच तयार करीत आहेत. शिवाय निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांना धमक्याही दिल्या जात आहेत. माझी तमाम मुंबईकरांना विनंती आहे की, मतदान केंद्रावर जा आणि मोठ्या संख्येने मतदान करा. 6 वाजले तरी जितके लोक आतमध्ये असतील, त्या प्रत्येकाला मतदान करता येते. त्यामुळे मतदानाचा आपला हक्क बजावल्याशिवाय राहू नका.