21 C
New York

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगासह मोदींवर हल्लाबोल

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीचा (Loksabha Elections) पाचवा टप्पा महाराष्ट्रात पार पडत आहे. आज मुंबईसह (Mumbai) उनगरांत मतदान प्रक्रिया राबववली जात आहे. असं असताना मात्र, मतदारांकडून अनेक तक्रारी समोर येत आहेत. मतदान अगदी संथगतीने सुरू आहे. यावर अनेक नेत्यांनी आक्षेप नोंदवला आहे. यावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी निवडणूक आयोगासह (Election Commission) नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर पत्रकार परिषदेमधून हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, काही विशिष्ट वस्त्यांमध्ये मतदान मुद्दामहून उशिराने केलं जात आहे. निवडणूक आयोग हे पंतप्रधान मोदींच्या घरगड्यासारखे काम करत आहेत. पराभवाच्या भीतीने हे सगळं सुरू आहे. तरीसुद्धा मी मतदारांना आवाहन करतो की, तुम्ही मोदींच्या या डावाला बळी पडू नका. सकाळी 5 वाजले तरी चालतील, तुम्ही तुमचा मतदानाचा हक्क बजावा, असे उद्धव ठाकरे म्हटलं आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले की, निवडणूक आयोग पक्षपातीपणा करत आहे. तर मतदान केंद्रावर दिरंगाई होत आहे, तिथे मतदारांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय नाही, पराभवाच्या भीतीने निवडणूक आयोगाचा वापर भाजपकडून सुरू असल्याचंही उध्दव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img