लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान देशभरात पार पडत असून मुंबईतील सहा जागांसह महाराष्ट्रातील 13 जागांवर मतदान होत आहे. तत्पूर्वी महायुतीच्या उमेदवारांसाठी गेल्या आठवड्यात छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर ऐतिहासिक सभा पार पडली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेही या सभेला महायुतीच्या नेत्यांसोबतच उपस्थित होते. या सभेनिमित्त राज ठाकरे (Raj Thackeray) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे एकाच मंचावर आले. राज ठाकरे यांनी एवढंच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर भाषण केलं. राज ठाकरे यांना प्रोटोकॉल बाजूला सारुन महायुतीने स्पेशल ट्रीटमेंट दिली अशी चर्चा सुरू झाली. त्यावरून विरोधकांनी टीकाही केली.
मात्र त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनीच चोख प्रत्युत्तर दिलं. राज ठाकरे यांना पंतप्रधान मोदींच्या आधी बोलण्याची संधी दिली. पंतप्रधान मोदींच्या सोबत राज ठाकरे यांचे सौहार्दाचे संबंध आले. यामुळे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना मिरच्या झोंबल्या आहेत, अशी टीका आशिष शेलार यांनी केली.
खैरनार आता कुठे आहेत? शरद पवारांचा सवाल
Ashish Shelar मुंबईकर महायुतीसाठीच मतदान करतील
मुंबईतील सहा जागांसाठी आज मतदान होत आहे. याबद्दल आशिष शेलार यांनी प्रतिक्रिया दिली. मुंबईत ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा झाल्या, त्याला जो प्रतिसाद मिळाला ते पाहता मुंबईकर मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडतील आणि महायुतीसाठीच मतदान करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महायुती साठी सहाही जागा महत्त्वाच्या आहेत कारण मुंबई ही आर्थिक राजधानी त्यामुळे असे त्यांनी नमूद केले.
Ashish Shelar निकालात उद्धव ठाकरेंचा नंबर खालचा
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान खालच्या दर्जाची भाषा विरोधकांनी विशेषत: उद्धव ठाकरेंनी वापरली. त्यामुळे निवडणुकीच्या निकालातही उद्धव ठाकरे गटाचा नंबर खालचाच राहील असा टोला शेलार यांनी लगावला. उद्धव ठाकरे यांनी जी भाषा पंतप्रधान मोदी यांच्यासाठी वापरली ती महाराष्ट्रासाठी चांगली नाही असेही ते म्हणाले. शाळेतला हुशार विद्यार्थी आपल्या अभ्यासावर भर देत असतो ढ विद्यार्थी मात्र अभ्यास करण्यापेक्षा हुशार विद्यार्थ्याला दोष देतात हीच परिस्थिती विरोधकांची झाली आहे. 25 पंचवीस सभा झाल्या, म्हणून त्यांचा जळफळाट होत आहे,अशी टीकाही त्यांनी केली.