19.7 C
New York

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं सहकुटुंब मतदान

Published:

मुंबई

देशात पाचव्या टप्प्यात आज 49 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक (LokSabha Election) पार पडत आहे. राज्यातील पाचव्या टप्प्यातील अखेरची टप्प्यात असलेल्या या निवडणुकीत 13 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक पार पडत आहे. यामध्ये मुंबईतील (Mumbai) सहा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सहकुटुंब मतदानाच्या (Voting) हक्क बजावला आहे. विशेष म्हणजे मतदानाचे रंगीत उभे राहून उद्धव ठाकरे यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

मुंबई, नाशिक, ठाणे कल्याणसह राज्यातील 13 जागांसाठी लोकसभेचे मतदान होत आहे. मुंबईतील सर्वच मतदार केंद्रांवर सकाळपासूनच सामान्यांसह, बॉलिवूड सेलिब्रेटी, राजकीय नेत्यांनी गर्दी केल्याचे पाहायला मिळत आहे.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी देश जुमलाबाजीला कंटाळला आहे, पैशाने मत विकत घेता येत नाहीत असा टोला लगावत मतदान करण्याचे आवाहन केले.

उद्धव ठाकरे म्हणाले की, देशातील लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी बाहेर पडून पडून मतदानाचा हक्क अबाधित राहावा यासाठी मतदान करतील. आज एका निगेटिव्ह विषय हा जुमलेबाजांच्या बाजूने जातोय, कारण पैशाचा पाऊस स्वीकारणार नाहीत, कारण पैसा घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला नाहीत. तसेच पैशांच्या प्रलोभनांना जनता भुलणार नाही असा विश्वासही उद्धव ठाकरेंनी व्यक्त केलं आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img