3.6 C
New York

Loksabha : नाशिकमध्ये शेतकऱ्यांकडून कांद्याची माळ घालून मतदान

Published:

नाशिक

देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पाचव्या टप्प्यातील मतदान आज पार पडत आहे. तर राज्यातील शेवटची टप्प्यातील 13 लोकसभा (Loksabha) मतदारसंघावर मतदान पार पडत आहे. राज्यातील शेतकऱ्यांचा कांदा (Onions) प्रश्न निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चांगलाच घडला होता. आज नाशिकमध्ये सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानावेळी शेतकऱ्यांनी (Farmers) आणि विरोधी पक्षाचे नेत्यांकडून कांदा आणि टोमॅटोची (Tomatoes) माळ गळ्यात घालून मतदानाचा हक्क बजावला आहे.

नाशिकच्या चांदवड तालुक्यातील वडगाव-पंगू येथील काही तरुण शेतकऱ्यांनी कांद्याला भाव नसल्याने निषेध म्हणून कांद्याच्या माळा गळ्यात घालून मतदानाला जाण्याचा प्रयत्न केला. या तरुणांना मतदान केंद्राचे गेटवरवरच पोलिसांनी अडवत गळ्यातील कांद्याच्या माळा काढण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांबरोबर त्यांची शाब्दिक चकमक झाली. अखेर गळ्यातील माळा काढून ठेवत मतदानाला गेले.

कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यांचे अनोखे मतदान केले. चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू येथील शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला. ऐन कांदा काढणीस केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्याने बाजारपेठेतील बाजारभाव कोसळले होते. परिणामी त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. त्याचा परिणाम स्वरुप शेतकऱ्यांनी कांद्याच्या माळा गळ्यात घालून नाराजी व्यक्त केली.

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या माजी आमदार दीपिका चव्हाण यांनी सहकुटुंब कांद्याची माळ घालून मतदानाचा अधिकार बजावला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img