सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) रणधुमाळी सुरु आहे. अशातच आज पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक आहे. सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. बॉलीवूडमधील (Bollywood)अनेक कलाकार निवडणुकीमध्ये भवितव्याचा फैसला होणार आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार मतदानाचा हक्क बजावत आहेत. परंतु भारतात राहूनदेखील बॉलिवूडच्या अनेक अभिनेत्री मतदानाचा हक्क बजावता येत नाही. यात आलिया भट्ट ते सनी लिओनीचा समावेश आहे.
बॉलीवूडची सुपरस्टार आलिया भट्टला (Alia Bhatt) भारतातील निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही. कारण तिच्याकडे भारतीय नागरिकत्व नसून ब्रिटिश नागरिकत्व आहे. आलियाचा जन्म लंडनमधील बर्मिंघममध्ये झाला आहे. तिच्या आईचा जन्मदेखील याच शहरात झाला आहे. त्यामुळे भारतीय कायद्यानुसार तिला मतदान करता येत नाही. जॅकलिनचे वडील श्रीलंकेतील असून आई मलेशियाची आहे आणि टीईचा जन्म बहरीनमध्ये झाला आहे. त्यामुळे जॅकलिनकडे श्रीलंकेचं नागरिकत्व आहे. याकारणास्तव जॅकलिनला मतदान करता येत नाही.
नोरा फतेहीला (Nora Fatehi) सुद्धा भारतात मतदान करण्याचा अधिकार नाही. नोराचा जन्म मोरक्को आहे. तिचे आई-वडील मोरक्कोमधील आहेत. त्यामुळे तिच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. म्हणून तिला भारतात मतदानाचा हक्क बजावत येत नाही. करनजीत कौर म्हणजेच सनी लिओनीचं (Sunny Leone) खरं नाव आहे. तिच्याकडे कॅनडाचं नागरिकत्व आहे. त्यामुळे ‘लोकसभा निवडणुक 2024’मध्ये मतदान करण्याचा तिला हक्क नाही.
बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफकडे (Katrina Kaif) ब्रिटिश नागरिक असून तिच्याकडे भारताचं नागरिकत्व नाही आहे. कतरिनाचा जन्म ब्रिटिश हांगकांगमध्ये झाला आहे. कतरिनाचे वडील मोहम्मद कैफ हे ब्रिटिश उद्योगपती आहेत. तर आई सुजाना आहे. त्यामुळे हिंदी चित्रपटसृष्टीत यशस्वी करिअर करुनही कतरिनाला भारतात मतदान करता येत नाही. शाहरुख खान, सलमान खान, अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.