8.5 C
New York

Loksabha Elections : राज्यात सकाळी 11 पर्यंत 15.93 टक्के मतदान

Published:

मुंबई

आज महाराष्ट्रात पाचव्या टप्प्याचे मतदान पार पडले आहे. सकाळी 7 ते 11 पर्यंत महाराष्ट्र सरासरी15.93 टक्के मतदान झाले आहे. लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यासाठी आज 6 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशातील 49 जागांवर मतदान होत आहे. या टप्प्यात राज्यातील एकूण 13 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. मुंबईतील (Mumbai) सहा मतदारसंघाशिवाय, नाशिक, दिंडोरी, ठाणे, कल्याण, पालघर, भिवंडी आणि धुळे या सहा लोकसभा मतदारसंघात (Maharashtra Loksabha Election) मतदान होत आहे. सकाळी सात वाजत मतदान सुरू झालं.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदान होत आहे. सकाळी 11:00 वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान दिंडोरी लोकसभा मतदारसंघात 19.50% सरासरी नोंद करण्यात आली आहे. तर सर्वाधिक कमी मतदान मुंबई दक्षिण मध्ये 12.75% सरासरी नोंद झाली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सोमवारी महाराष्ट्रातील 13 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यातील 48 पैकी 35 जागांसाठी 4 टप्प्यात निवडणूक पार पडली. लोकसभेच्या 13 जागांसाठी 264 उमेदवार रिंगणात आहेत. मुंबईतील 6, ठाण्याचा 3, पालघरचा 1, नाशिकचा 2 आणि धुळ्याचा 1 मतदारसंघांचा समावेश आहे.महाराष्ट्रातील प्रमुख उमेदवारांमध्ये केंद्रीय मंत्री पियुष गोयल, अभिनेते-राजकारणी भूषण पाटील, उज्ज्वल निकम, वर्षा गायकवाड, अरविंद सावंत, यामिनी जाधव, खासदार राहुल शेवाळे, माजी खासदार अनिल देसाई, रवींद्र वायकर, अमोल कीर्तीकर, श्रीकांत शिंदे आणि हेमंत तुकाराम गोडसे यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील पाचव्या टप्प्यात सर्वांच्या नजरा या उमेदवारांवर असतील.

मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे

धुळे- १७.३८ टक्के
दिंडोरी- १९.५० टक्के
नाशिक – १६.३० टक्के
पालघर- १८.६० टक्के
भिवंडी- १४.७९ टक्के
कल्याण – ११.४६ टक्के
ठाणे – १४.८६ टक्के
मुंबई उत्तर – १४.७१ टक्के
मुंबई उत्तर – पश्चिम – १७.५३ टक्के
मुंबई उत्तर – पूर्व – १७.०१ टक्के
मुंबई उत्तर – मध्य – १५.७३ टक्के
मुंबई दक्षिण – मध्य- १६.६९ टक्के
मुंबई दक्षिण – १२.७५ टक्के

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img