21 C
New York

Leopard : काळवाडीत दुसरा तर या परिसरात 8 बिबट्या जेरबंद

Published:

रमेश तांबे, ओतूर

जुन्नर तालुक्यातील काळवाडी शिवारात सोमवारी (दि.20) रोजी पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. आत्तापर्यंत काळवाडी येथे दोन बिबट्यांना (Leopard) जेरबंद करण्यात आले असून, या परिसरात जेरबंद केलेल्या बिबट्यांची एकूण संख्या आठ वर पोहोचली आहे.

गेल्या आठवड्याभरात काळवाडी,पिंपरीपेंढार येथील गाजरपट,पिंपळवंडी,चाळकवाडी,वामनपट्टा परिसरात आणि इतर ठिकाणी,जुन्नर वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यामध्ये आत्तापर्यंत एकूण आठ बिबटे जेरबंद करण्यात आले असल्याची माहिती ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव काकडे यांनी दिली.

दरम्यान सोमवारी दि. २० रोजी काळवाडी येथे जेरबंद केलेल्या बिबट्याच्या मादीचे वय ४ ते ५ वर्षाचे असून,सदर बिबट्याच्या मादीला रेस्क्यू टीम चे सदस्य व वन कर्मचाऱ्यांनी जुन्नर येथील माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हालवले आहे.

जुन्नर तालुक्यातील शिरोली खुर्द येथे दि.११ एप्रिल रोजी संस्कृती संजय कोळेकर या दीड वर्षाच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला केल्याने तिचा मृत्यू झाला.

पिंपळवंडी लेंडेस्थळ येथे दि.५ मे रोजी अश्विनी मनोज हुलवळे वय २४ वर्ष, ही महिला शेतात खुरपणीचे काम करत असताना बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला गंभीर जखमी केल्याची घटना घडली होती. त्यानंतर काळवाडी येथे दि.८ मे रोजी यात्रेनिमित्त आत्याच्या गावी आलेल्या रूद्र महेंद्र फापाळे या आठ वर्षाच्या बालकावर बिबट्याने हल्ला केल्याने, त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर पिंपरी पेंढार गाजरपट येथे दि. १० मे रोजी नानूबाई सिताराम कडाळे वय ४५ वर्ष, ही महिला शेतात बाजरी राखण्याचे काम करत असताना,बिबट्याने तिच्यावर हल्ला करून तिला ठार मारले.

या महिन्याभरात बिबट्याच्या हल्ल्यातील चार घटना

पिंपरी पेंढार गाजरपट येथे दि.१० व दि.११ रोजी दोन बिबटे आणि एक बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली.

दि.१० रोजी पिंपळवंडी लेंडेस्थळ येथे बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली. त्यानंतर दि.१३ रोजी काळवाडीत बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली. त्यानंतर बुधवारी

दि.१५ रोजी चाळकवाडी वामनपट्टा शिवारात दत्ताजी बाळाजी वामन,यांचे शेतात सहाव्या बिबट्या जेरबंद करण्यात आला.त्यानंतर त्याच दिवशी दि.१५ रोजी रात्री नऊ वाजता काळवाडीत बिबट्याची मादी जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यानंतर पुन्हा दि.२९ रोजी काळवाडीत आठवी बिबट्याची मादी जेरबंद करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img