सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची (Loksabha Elections) रणधुमाळी सुरु आहे. अशातच आज पाचव्या टप्प्यातील लोकसभा निवडणूक आहे. सहा राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील 49 जागांसाठी मतदान होणार आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार निवडणुकीमध्ये भवितव्याचा फैसला होणार आहे. बॉलीवूडमधील अनेक कलाकार मतदानाचा हक्क बजावत आहेत. अशातच अभिनेत्री आणि टीव्ही होस्ट गौहर खान (Gauahar Khan) चर्चेत आली आहे. तिचे नाव मतदारांच्या यादीत नसल्याची माहिती मिळत आहे.
सोमवारी दुपारी मुंबईत मतदान करण्यासाठी गौहर बाहेर पडली परंतु आधार कार्ड असूनही तिच्या बोटाला शाई लागली नाही असे दिसते. त्यामुळे गौहरने भारतीय निवडणूक आयोगाकडे नागरिकांना आधार कार्ड किंवा पासपोर्टच्या आधारे मतदान करण्याची परवानगी देण्याचे आवाहन केले. पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, गौहर मतदान केंद्रातून बाहेर पडताना दिसत आहे परंतु ती म्हणाली, “आत मतदान केंद्रावर खूप गोंधळात टाकणारी परिस्थिती आहे.
बॉलीवूडमधील ‘हे’ कलाकार बजावत नाही मतदानाचा हक्क! कारण…
ही व्हिडिओ तिने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर स्टोरीदेखील टाकली आहे. ज्यात ती म्हणाली,”आपला आधार कार्ड हीच आपली ओळख असते. जर आम्हाला मतदान करण्यासाठी पुरेसे नागरिक मानले जात नसेल तर आमच्याकडे आधार कार्ड का आहे? तुमचे आधार कार्ड ही तुमची ओळख आहे की तुम्ही भारतीय नागरिक आहात आणि तुम्ही त्याद्वारे मतदान करू शकता. मी आधार कार्ड आणि ओळखपत्र घेऊन मतदान केंद्रावर गेले. पण ते म्हणाले की तुम्ही मतदान करू शकत नाही कारण तुमचे नाव यादीत नाही.” यावर संताप व्यक्त करत अभिनेत्रीने हा व्हिडिओ बनवला.
बॉलीवूडमधील अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, जान्हवी कपूर, हेमा मालिनी यांनी मतदानाचा हक्क बजावत चाहत्यांना मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.