23.1 C
New York

Eknath Shinde : श्रीकांत हॅटट्रिक करणार, मुख्यमंत्री शिंदेंना विश्वास

Published:

ठाणे

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यातील 13 जागांसाठी आज महाराष्ट्रात मतदान पार पडत आहे. यामध्ये मुंबईतील (Mumbai) 6 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मात्र, सर्वांचं लक्ष कल्याण लोकसभा (Kalyan loksabha) मतदारसंघाकडे लागून राहिलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज ठाण्यातील वागळे इस्टेट येथील नेपच्यून आय टी पार्कमधील मतदान केंद्रात सहकुटुंब जाऊन मतदान केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे कल्याणमधून तिसऱ्यांदा निवडणूक लढवत आहेत. त्यांच्याविरोधात शिवसेना ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे.

दरम्यान, डॉ. श्रीकांत शिंदे कल्याणमधून विजयाची हॅटट्रिक करणार, त्याचा रेकॉर्ड ब्रेक मतांनी विजय होणार, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. श्रीकांत शिंदे यांनी कल्याण लोकसभा मतदारसंघात चांगलं काम केलं असून मतदार त्यांना नक्कीच पसंती देणार, असंही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, श्रीकांत शिंदे यांनी केलेले काम लोकांसमोर आहे. या मतदारसंघात त्यांनी चांगली विकासकामे केलेली आहेत. आज सकाळपासून मतदानासाठी मतदारांचा प्रचंड उत्साह दिसून येत असून, सुदृढ लोकशाहीसाठी तसेच देशाला प्रगतीकडे नेण्यासाठी, महासत्ता बनवण्याच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकण्यासाठी आवर्जून मतदान करावे, असे आवाहन शिंदे यांनी मतदारांना केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे वडील संभाजी शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, मुलगा डॉ. श्रीकांत शिंदे आणि सून सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img