23.1 C
New York

Loksabha : ओशिवरा मतदान केंद्राबाहेर भाजप-ठाकरे गट राडा

Published:

मुंबई

देशात आज पाचव्या (Loksabha Election) टप्प्यातील मतदान पार पडत आहे. मतदान प्रक्रिया (Voting) सुरळीत पार पडावी यासाठी ठिकठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या टप्प्यात मुंबईत (Mumbai) पाच टप्प्यात मतदान पार पडतंय. मुंबईतील ओशिवरामध्ये मतदान (Oshiwara Polling Booth) केंद्रावर भाजप आणि ठाकरे गटात (BJP Vs Thackeray Group) वाद झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे कार्यकर्ते प्रचार करत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. दोन्ही गटांत शाब्दिक चकमक (Loksabha) झाल्यानंतर मतदान केंद्रावर गोंधळ घालणाऱ्यांना पोलिसांनी केंद्रावरुन बाहेर काढल्याची माहिती मिळत आहे.

आमदार भारती लवेकर आणि भाजपच्या नेत्या दिव्या ढोले हे मतदारांशी संवाद साधत त्यांना प्रलोभन दाखवत असल्याचा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली आणि भारती लवेकर, दिव्या ढोले यांच्यासह ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना मतदान केंद्राबाहेर काढले.

उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या ओशिवरा येथील एका मतदान केंद्रावर शांततेत मतदान सुरू होते. या मतदान केंद्रामध्ये वर्सोवा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार भारती लवेकर आणि भाजपच्या नेत्या दिव्या ढोले फिरत होत्या. या दोघी याठिकाणी आल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. या मतदारसंघात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्षेप घेत आमदार भारतीय लवेकर आणि दिव्या ढोले यांच्यावर आचारसंहिता भंगाचा आरोप केला. या दोघी देखील गेल्या तासाभरापासून मतदारांना कन्व्हेंस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे देखील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी सांगितले. या सर्व गोंधळानंतर या ठिकाणी बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांकडून दिव्या ढोले आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मतदान केंद्राबाहेर काढले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img