नवी दिल्ली
देशात लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्याचे आज मतदान पार पडत आहे. यातच आम आदमी पार्टीचे (AAP) संस्थापक तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. दिल्लीतील दारू धोरण घोटाळ्या प्रकरणात ईडीकडून (ED) अरविंद केजरीवाल यांच्या संदर्भात मोठा धक्कादायक खुलासा करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईडीने केंद्रीय गृहमंत्रालयाला याबाबत एक अहवाल दिला आहे. यामध्ये आपला 2014 ते 2022 या काळात 7.08 कोटी रुपये विदेशी फंड मिळालेला आहे. ईडीने एजन्सीवर परदेशी फंड मिळवणं FCRA, RPA आणि IPC चं उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.
हा फंड मिळवण्यासाठी आपने परदेशातल्या देणगीदारांची ओळख आणि त्यांची नागरिकत्व लपवून ठेवल्याचा ईडीचा आरोप आहे. अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, सौदी अरब, संयुक्त अरब अमिरात, कुवेत, ओमानसह अन्य देशांकडून अनेक देगणीदारांकडून फंड प्राप्त झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. विशेष म्हणजे फंड ट्रान्सफर करण्यसाठी वेगवेगळ्या दात्यांकडून एकच पासपोर्ट नंबर, क्रेडिट कार्ड, ईमेल आयडी आणि मोबाईल नंबरचा वापर करण्यात आलेला असल्याचं ईडीने म्हटलं आहे.