19.7 C
New York

loksabha Election : अनिल अंबानी पाहत होते मतदान सुरु होण्याची वाट

Published:

लोकसभा निवडणुकीच्या (loksabha Election) मुंबईतील सहा जागांवर २० मे रोजी मतदान सुरु झाले. मतदानासाठी सकाळापासून सर्वसामान्य मतदारांनी रांगा लागल्या. त्याच्याप्रमाणे बॉलीवूडमधील कलाकार, उद्योजक मतदानासाठी बाहेर पडले. राज्यातील सर्वत्र मतदारांमध्ये चांगलाच उत्साह दिसून येत आहे. मतदानास सकाळी सात वाजता सुरुवात होण्यापूर्वी मतदार रांगेत होते. प्रसिद्ध उद्योगपती अनिल अंबानीसुद्धा मतदान सुरु होण्यापूर्वी रांगेत लागलेले दिसन येत आहे. त्यांचा व्हिडिओ समोर आला आहे.

देशात सर्वसामान्य व्यक्तीपासून बड्या व्यक्तीपर्यंत सर्वांना मतदानाचा समान अधिकारी आहे. मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रिलायन्स अनिल धीरूभाई अंबाणी ग्रुपचे चेअरमन अनिल अंबानीसुद्धा सकाळीच बाहेर पडले. सकाळी ६.४५ च्या सुमारास मतदान सुरु होण्यापूर्वी ते रांगेत लागले होते. कुलाबा मतदान केंद्राबाहेर मतदान सुरु होण्याची ते वाट पाहत होते. कप परेडमध्ये राहणारे अनिल अंबानी रांगेत काही जणांशी संवाद साधत होते. त्या रांगेत त्यांचा आठ ते दहावा क्रमांक दिसत होता. मुंबईतील गर्मीचा त्रास त्यांना होत होता. अनिल अंबानी रांगेत उभे असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. २८ सेंकदाचा हा व्हिडिओ असून त्यात अनिल अंबानी मतदान केंद्राबाहेर वाट पाहताना दिसत आहे.

महाराष्ट्रात आज शेवटच्या टप्प्यात मतदान

loksabha Election अक्षय कुमार लागला रांगेत

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार मतदानासाठी रांगेत लागला. अक्षय कुमारने जुहू येथे मतदान केले. अक्षय कुमार याने मतदान करुन आल्यानंतर सर्व जनतेला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी अक्षय कुमारने यंदा आतापर्यंतचे सर्वाधिक मतदानाचा विक्रम होणार असल्याचे सांगितले. दुसऱ्यांदा भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर अक्षय कुमार पहिल्यांदा मतदानासाठी गेला होता.

loksabha Election उमेदवारांनी केले मतदान

उमेदवार आणि लोकप्रतिनिधी यांनी सकाळीच आपला मतदानाचा हक्क बजावला. यामिनी जावध यांनी सकाळीच मतदान केले. उत्तर मध्य मुंबईचे उमेदवार उज्वल निकम यांनी सिद्धिविनायकाचे दर्शन घेऊन मतदान केले. राहुल शेवाळे यांनीही मतदान केले. उल्हासनगरमधील भाजपचे आमदार कुमार आयलानी यांनी देखील आपल्या मतदानाचा हक्क बजावला.

loksabha Election काही ठिकाणी ईव्हीएम पडले बंद

डोंबिवलीतील मंजुनाथ विद्यालय येथील मतदान केंद्रावरील एक ईव्हीएम मशीन बंद पडली. ईव्हीएम बंद पडण्याच्या घटना इतर ठिकाणी घडल्या. निवडणूक कर्मचाऱ्यांनी ईव्हीएम मशीन बदलून मतदान सुरु केले. त्यामुळे काही ठिकाणी मतदानास उशीर झाला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img