19.7 C
New York

Baramati : बारामतीत निवडणुकीत पैसे वाटल्या प्रकरणी गुन्हा दाखल

Published:

बारामती ( Baramati ) लोकसभा मतदारसंघात लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान पार पडलं. मात्र याच मतदारसंघातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. आमदार रोहित पवार ( Rohit Pawar ) यांनी अगदी पोलीस बंदोबस्तात या मतदारसंघात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. त्याचे व्हिडीओ देखील त्यांनी आपल्या ट्विटवर पोस्ट केले होते. बारामतीत निवडणुकीत पैसे वाटल्या प्रकरणी अखेर गुन्हा दाखल ( Case filed ) करण्यात आला आहे.

रोहित पवार यांनी सात मे रोजी आपल्या ट्विटर अकाउंटवरून या संदर्भात काही व्हिडिओ पोस्ट केले होते. त्याची दखल घेत बारामतीची तहसीलदार यांच्यामार्फत पुणे जिल्हा परिषदेचे उपविभाग पाटबंधारे शाखा अभियंता केशव तुकाराम जोरी यांनी याबाबत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, पैसे वाटपाचा प्रकार सुरू आहे. तसेच रोहित पवार यांनी दिलेल्या कॅप्शननुसार अजित पवार यांच्या कारवाई केलेल्या कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसोबत त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नातलगाचा हा पैसे वाटल्याचा व्हिडिओ असल्याचा म्हटलं होतं. बारामती लोकसभा मतदारसंघात त्यामुळे आता मतदारानंतर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर नवा ट्विस्ट समोर आला आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर टीका

या मतदारसंघात हायहोल्टेज लढत झाली. महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे आणि महायुतीच्या सुनेत्रा पवार यांच्यात लढत झाली. एका अर्थाने ही निवडणूक शरद पवार विरुद्ध अजित पवार अशीच झाली आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांनी जोरदार प्रचार केला होता. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरची ही पहिली मोठी निवडणूक आहे. त्यामुळे दोन्ही नेत्यांसाठी ही निवडणूक महत्वाची ठरणार आहे. या लढतीमध्ये कोणाचा विजय होणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img