21 C
New York

Uddhav Thackeray : चंद्रशेखर बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल

Published:

नाशिक

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) अनेक आजार झाले आहेत. सध्या ते चिडलेले आणि घाबरलेले आहेत. त्यामुळे सध्या त्यांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. चोरांचे सरदार कोण आहेत? हे संपूर्ण राज्याने पाहिले आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई महापालिकेची (BMC) लूट केली आहे अशा शब्दात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्याचा विकास करत आहेत. तर, दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यांनी मुंबई लुटली. महाविकास आघाडीचे नेते सध्या हरलेल्या मन:स्थितीमध्ये आहेत. आणि माणूस जेव्हा हरतो, तेव्हा तो अशी काही विधाने करतो. असा टोला त्यांनी लगावला. सध्या शरद पवरांना बारामतीमध्ये गल्लोगल्ली फिरावे लागले. म्हणजेच त्यांना पराभवाची चाहूल आहे, असा दावा यावेळी बावनकुळे यांनी केला.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडले नसते आणि ते काँग्रेससोबत गेले नसते, तर त्यांना नैराश्य आले नसते. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित नव्हती ती चूक उद्धव ठाकरेंनी केली. त्यांना एका विशिष्ट समाजाची मते हवी आहेत त्यामुळे भगव्या ध्वजाला ठाकरे आता फडके म्हणतात. मताच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे आपल्या उंचीपेक्षा जास्त बोलत आहेत अशी टीका केली. तसेच, राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही मागण्या केल्या असून त्यांच्या मागण्या पंतप्रधान मोदी नक्कीच पूर्ण करतील असा दावा त्यांनी केला.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img