बैलगाडा शर्यत म्हणजे एकदम मातीतील खेळं. Bullock Cart Race रांगड्या गड्यांनी खिल्लारी बैलाच्या मशागतीने दम दाखवला की मिळवलं. मातीशी नाळ घट्ट करणाऱ्या या खेळाला दृष्ट लागली होती. पण आता समदं कसं व्यवस्थित झालंय. पण एक अजून नियम आलाय बघा. येत्या १ जूनपासून ईअर टॅग (बिल्ला) नसलेल्या पशुधनाची, बाजार समित्या, आठवडी बाजार व गावांतील खरेदी- विक्री व बैलगाडा शर्यत आयोजन करण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे. याबाबत संबंधित बाजार समितीने दक्षता घ्यावी, तसेच ग्रामपंचायत, महसूल विभाग, गृह विभाग यांनी टॅग नसलेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये सहभाग घेण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिले आहेत.
Bullock Cart Race पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक
नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन (एनडीएलएम) अंतर्गत ‘भारत पशुधन प्रणाली’ मध्ये ईअर टॅगिंग केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वंकष नोंदी घेण्यात येत असून शेतकऱ्यांनी आपल्या पशुधनाचे ईअर टॅगिंग करून घेणे बंधनकारक असल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. या निर्णयाची सर्व संबंधित विभागांनी काटेकोर अंमलबजावणी करावी, असे आदेश दिवसे यांनी दिले आहेत. ईअर टॅगशिवाय पशुधनास पशुवैद्यकीय संस्था, दवाखान्यामधून कोणतीही पशुवैद्यकीय सेवा देण्यात येऊ नये. तसेच कत्तलखान्यामध्ये टॅग असल्याशिवाय म्हैसवर्गीय जनावरांची कत्तल करण्यास परवानगी देण्यात येऊ नये, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
दादरच्या मॅकडॉनल्ड्स मध्ये स्फोटाची धमकी
पशुधनाच्या मालकी हस्तांतरणाबाबतच्या नोंदी संबधित पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्वरित अद्ययावत करून घेण्याची जबाबदारी संबधित पशुपालकाची राहील. ग्रामपंचायतीमध्ये पशुच्या विक्री किंवा परिवर्तनाचा दाखला देताना पशुधनाचे ईअर टॅगिंग झाल्याशिवाय तो देण्यात येऊ नये. दाखल्यावर ईअर टॅगचा क्रमांक नमूद करण्यात यावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या भारत पशुधन प्रणालीमध्ये ईअर टंगिग (१२ अंकी बार कोडेड) केलेल्या सर्व पशुधनाच्या सर्वकष नोंदी घेण्यात येत आहेत बाजार समिती, आठवडी बाजार खरेदी विक्री संघ, यांनी इतर पशुधनाची ही विक्री करताना हा इअर टॅग दिला आहे का नाही यावर लक्ष द्यावे लागणार आहे. नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी, असा शासन आदेश आला आहे. तेव्हा बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी इअर टॅगिंग जरुर करुन घ्या.