26 C
New York

Lal Salaam : सुपरस्टार रजनीकांतचा ‘लाल सलाम’ आता हिंदीत

Published:

दक्षिण भारतातील सिनेमा हिंदी भाषिक पट्ट्यात धुमाकूळ घालत आहेत. या भागात साऊथच्या सिनेमांना मोठा प्रेक्षक वर्ग मिळत आहे. त्यातही जर सुपरस्टार रजनीकांतचा सिनेमा असेल तर मग विचारायलाच नको. रजनीकांतचा चित्रपट जसा दक्षिण भारतात चालतो तशीच क्रेझ आता उत्तर भारतातही दिसत आहे. हिंदी भाषेत डब केलेल्या चित्रपटांना मोठी गर्दी होते. हिंदी भाषकांचं रजनीकांतच्या चित्रपटावरील हे प्रेम पाहून कार्मिक फिल्म्सने लोकप्रिय चित्रपट लाल सलाम हिंदी (Lal Salaam) भाषेत रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.

तामिळ भाषेत तयार करण्यात आलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हीट ठरला. आता या चित्रपटाचे हिंदी भाषेत डबिंग केले जाणार आहे. या चित्रपटाचा प्रीमियर येत्या २४ मे रोजी आयोजित करण्यात आला आहे. दक्षिण भारतातील सिनेमे उत्तर भारतात लोकप्रिय होऊ लागले आहेत. रजनीकांतच्या चित्रपटांची येथेही खास क्रेझ आहे. हिंदी भाषेत डब केलेल्या त्याच्या चित्रपटांना चांगली गर्दी होत आहे. मागील तीन ते चार वर्षांपासून हा ट्रेंड आकारास आल्याचे दिसत आहे.

मान्सून अंदमानात दाखल

या चित्रपटात अशा व्यक्तीची कथा पाहण्यास मिळणार आहे जो आपल्या दबंग स्वभावासाठी ओळखला जातो. आत्मशोध आणि शौर्याच्या भावनिक यात्रेच्या माध्यमातून त्याला प्रायश्चित्त करण्याचा मार्ग मिळतो. तो अशा लोकांच्या मनात सन्मान मिळवतो जे त्याला या ब्रह्मांडाच्या बाहेर घेऊन जाण्यासाठी सक्षम असतात. या चित्रपटाने तामिळ बॉक्स ऑफिसवर प्रचंड यश मिळवलं. रजनीकांतचा दमदार अभिनय आणि तितकीच दमदार कथा यामुळे चित्रपटाला यश मिळालं. हा चित्रपट या वर्षातील सर्वाधिक चर्चा होणाऱ्या चित्रपटांच्या यादीत गणला जातो.

कार्मिक फिल्म्सने या चित्रपटाच्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे. कार्मिक फिल्म्स फक्त मनोरंजनाचे माध्यम नाही तर विचारांना चालना देणाऱ्या आणि प्रेरणादायक चित्रपट बनवण्याच्या कार्यात आघाडीवर आहे. आता या कंपनीने लाल सलामच्या वितरणाची जबाबदारी घेतली आहे. येत्या २४ तारखेला या चित्रपटाचे प्रीमियर होणार आहे. हिंदी भाषेत हा चित्रपट येणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनी सिनेमागृहात जाऊन चित्रपट पहावा असे आवाहन करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img