5.2 C
New York

Shakuntala Railways : चोरट्यांनी थेट रेल्वे ट्रॅकच पळवला

Published:

अकोला

भारत स्वातंत्र्य होऊन कित्येक वर्ष लोटली. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाने खूप प्रगतीही केली आहे. भारतीय रेल्वेचे जाळे देशभरात पसरलेले आहे. तर जगातील चौथे सर्वात मोठे रेल नेटवर्क आहे. एकेकाळी पश्चिम वऱ्हाडाची लोकवाहीनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रिटीशकालीन शंकुतला रेल्वेचा (Shakuntala Railways) तब्बल 20 फुट अंतराचा लोहमार्ग चोरीला गेल्याची खळबळजनक घटना वाशीमच्या कारंजामध्ये घडली आहे.

शंकुतला रेल्वेच्या मार्गाचे ब्रॉडगेजमध्ये रुपांतर करण्याला मंजुरी मिळाली आहे. मात्र ऐतिहासिक नॅरोगेजचे लोहमार्ग आजही पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यात पसरले आहेत. आजही या लोहमार्गाची मालकी ब्रिटिश कंपनीकडे आहे. तर, अज्ञातांनी जवळपास 20 फूट अंतराचा रेल्वे मार्ग कटरच्या सहाय्याने कापून वेगळा केला आणि त्याखालील जवळपास दोन ते तीन क्विंटल वजनाचे लोखंड गज गायब केले.

1952 मध्ये भारतीय रेल्वेचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले होते. पण देशातील हा रेल्वे मार्ग मात्र सरकारच्या अखत्यारित नसून ब्रिटिश कंपनीच्या ताब्यात आहे. आजही ब्रिटनच्या क्लिक निक्सन अँड कंपनीच्या भारतीय युनिट सेंट्रल प्रोव्हिन्सेस रेल्वे कंपनीला या रेल्वे ट्रॅकसाठी करोडो रुपयांची रॉयल्टी द्यावी लागते. शंकुतला एक्स्प्रेस या नावाने याला ओळखले जाते. महाराष्ट्रातील यवतमाळ-मूर्तिजापूर-अचलपूर या मार्गावर धीम्या गतीने चालणारी नॅरोगेज रेल्वेगाडी. सुरुवातीला ही रेल्वे वाफेच्या इंजिनवर चालत होती. 6 डबे असलेली ही शकुंतला एक्स्प्रेस 190 किमी मार्गावर धावत होती. ही गाडी सध्या बंध आहे. मात्र, कमी भाडे असल्याने गरिबांना ही गाडी परवडत होती. मात्र या गाडीचा वेग अत्यंत कमी असल्याने यवचमाळ ते मूर्तिजापूर हे 114 किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी सहा ते सात तास लागायचे.

या रेल्वे मार्गावरील सिग्नलदेखील ब्रिटिशकालीन असून यावर मेड इन लिव्हरपूल असा उल्लेख आढळतो. गाडीचे वाफेचे इंजिनही मँचेस्टर येथे बनवले होते. 1923 पासून सलग 70 वर्षे ते सेवेत होते. त्यानंतर 1994 पर्यंत ही गाडी वाफेच्या इंजिनावर धावत होती. त्यानंतर गाडीला डबल इंजिन बसवण्यात आले होते. मात्र तिचा वेग काही बदलला नाही. 

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img