काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज रविवार (दि. 19 मे)रोजी पहाटे निधन झालं. आज दुपारी ४ वाजता प्रतापराव भोसले यांची अंत्ययात्रा निघणार असून दुपारी ५ वाजता भुईंज येथे देगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत. भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणारे प्रतापराव भोसले यांनी ४ वेळा आमदार आणि कॅबिनेट मंत्री म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली होती. राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांसोबत त्यांनी काम केले होते. कॅबिनेटमध्ये अनेक मंत्रिपदे भूषवतानाच त्यांनी काँग्रेसमध्ये संघटनात्मतक पदे भूषवली. ते काँग्रेस माजी प्रदेशाध्यक्ष होते. आज दुपारी ४ वाजता प्रतापराव भोसले यांची अंत्ययात्रा निघणार असून दुपारी ५ वाजता भुईंज येथे देगाव रस्त्यावरील त्यांच्या शेतात अंत्यसंस्कार होणार आहेत.
Prataprao Bhosale काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी
पुढे ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून ते ३ वेळा संसदेत खासदार म्हणून गेले. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर त्यांनी 1997 साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचं सरकार स्थापन केलं.
पुण्यात भरधाव कारने दोघांना चिरडलं
Prataprao Bhosale कृषी, सहकार क्षेत्रात मोठ योगदान
या कालावधीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम, कण्हेर धरण, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात मोलाचं योगदान दिलं. प्रतापराव भोसले यांच्या पश्चात माजी आमदार मदन भोसले, मोहनराव भोसले, गजानन भोसले हे तीन सुपुत्र, विवाहित कन्या पद्मादेवी पाटील, सूना, नातवंडे, परतुंडे असा परिवार आहे.त्यानंतर त्यांनी १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले. या कालावधीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम, कण्हेर धरण, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात महत्वपूर्ण योगदान दिले.