21 C
New York

Nitesh Rane : संजय राऊतांनाच मुख्यमंत्री व्हायचं होतं- नितेश राणे

Published:

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), अजित पवार Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्याच मंत्रिमंडळातील नेत्यांनी विरोध केल्याचा दावा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. त्यांच्या या आरोपावर अनेक प्रतिक्रिया येत आहे. आता भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांनाच मुख्यमंत्री व्हायची इच्छा होती. त्यामुळं त्यांनीच उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नावाला विरोध केला होता, असा पलटवार राणे यांनी केली.

नितेश राणे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयार भाष्य केलं. दरम्यान, राऊतांनी केलेल्या दाव्याविषयी विचारले असता राऊत म्हणाले की, संजय राऊत यांनी शरद पवार यांच्याकडे स्वतःला मुख्यमंत्री करण्यासाठी आग्रह धरला होता. एवढेच नाहीतर सामनाच्या कार्यालयातून देखील सर्व आमदारांना फोन करून राऊत यांचे नाव घेण्यासाठी सांगण्यात आलं होतं, असा आरोप नितेश राणे यांनी केला आहे.

 शिंदे तेव्हा कुणालाच नको होते, राऊतांचा नवा दावा


संजय राऊत हे उद्धव ठाकरेंना ब्लॅकमेल करत होते. मला मुख्यमंत्री केले नाही तर मातोश्रीमधील अनेक महत्वाची माहिती मी बाहेर सांगेल, असी धमकी राऊतांनी दिली होती असा आरोप राणेंनी केला.

शिवसेनेत जी फूट पडली त्याला देखील एक कारण आहे. भाजपला दोष देऊन चालणार नहाी. भारतीय जनता पक्षाने नेहमीच शिवसेनेला सपोर्ट दिला. आपण, एकत्र सरकार बनवू, असे भाजपने म्हटले होते. अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपदही देण्यास भाजप तयार होते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या अट्टाहासामुळं जे झालं त्याचे परिणाम आता सर्वांसमोर आहेत. पक्षाची हानी झाली तरी चालेल, पण मला खुर्ची हवी हा जो आग्रह होता, त्या आग्रहामुळंच घडलेलं हे राजकारण असल्याचा आरोप संजय शिरसाट यांनी केला.

Nitesh Rane काय आहे राऊत यांचा दावा?

2019 च्या निवडणुकीनंतर भारतीय जनता पक्षाचे नेते मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांना विरोध करत होते. त्यांच्या नेतृत्वात आपण काम करणार नसल्याचा निरोप भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मातोश्रीवर पाठवला होता. त्या नंतरच्या काळात महाविकास आघाडीची स्थापना झाली तेव्हा अजित पवार, दिलीप वळसे पाटील आणि सुनील तटकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध केला, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img