26.6 C
New York

RCB vs CSK: आरसीबी संघ प्लेऑफसाठी, चेन्नईचे पॅकअप

Published:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या 17 व्या हंगामातील 68 व्या सामन्यात (RCB vs CSK) इतिहास रचला असं म्हणायला हरकत नाही. आरसीबीने 22 मार्चच्या पराभवानंतर चेन्नई सुपर किंग्जचा पराभव करून वचपा काढला. आरसीबीचा हा सलग सहावा विजय ठरला. या विजयासह आरसीबीने 14 गुणांसह प्लेऑफमध्ये थेट प्रवेश केला आहे. आरसीबीने चेन्नईसमोर विजयासाठी 219 धावांचे आव्हान ठेवले होते. पण प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आरसीबीला हा सामना 18 धावांनी जिंकावा लागणार होता. पण आरसीबीच्या गोलंदाजांसमोर चेन्नईला 20 षटकांत 7 गडी गमावून 191 धावांपर्यंतच मजल मारता आली. या विजयासह आरसीबी संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला असून चेन्नईचे पॅकअप झाले आहे. तसेच आरसीबीच्या या विजयामुळे प्लेऑफमध्ये पोहोचणारे चारही संघ निश्चित झाले आहेत. आता पहिल्या 2 पदांसाठी चुरस निर्माण झाली आहे.

कोलकाता नाईट रायडर्स प्रथम प्लेऑफसाठी पात्र ठरला. त्यानंतर राजस्थान रॉयल्सने धडक मारली. सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचणारा तिसरा संघ ठरला. आता निर्णायक सामन्यात चेन्नईचा धुव्वा उडवून आरसीबीने प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे 4 संघ निश्चित झाले आहेत. पण टॉप 2 साठी लढत अजूनही आहे.

यश दयाल लगान चित्रपटातील ‘कचरा’ ठरला

प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 218 धावा केल्या आणि विजयासाठी 219 धावांचे आव्हान ठेवले. वास्तविक प्लेऑफचे आव्हान 200 धावांचे होते. त्यामुळे त्यांना चेन्नई सुपर किंग्जला 20 षटकांत 200 धावांपासून रोखण्यासाठी काहीही करावे लागले. पण रवींद्र जडेजा आणि महेंद्रसिंग धोनीच्या जोडीमुळे हे गणित सहज सुटणार असं वाटत होतं. शेवटच्या षटकात १७ धावांची गरज होती आणि फॅफने यश दयालकडे चेंडू सोपवला. रिंकू सिंगने शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून गेल्या मोसमात सामना जिंकला तोच हा दयाल. गुजरात टायटन्सने त्याला मिनी लिलावात सोडले. मात्र आरसीबीने त्याच्यावर विश्वास दाखवला. मात्र यश दयालने आपल्या कर्णधारचा आणि संघाचा निर्णय खरा ठरवला. महत्त्वाच्या सामन्यात यशने शेवटचे षटक टाकून संघाला प्लेऑफमध्ये नेले. यश दयालने एकूण चार षटके टाकली, 42 धावा दिल्या आणि 2 बळी घेतले. खरे तर यश दयाल लगान चित्रपटातील ‘कचरा’ ठरला अशी प्रतिक्रिया सोशल मीडियावर फिरत आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img