पंढरपूर
लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Elections) मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा कुठलाही परिणाम झाला नाही. राज्यात महायुतीचे (MahaYuti) उमेदवार 45 पेक्षा जास्ती जागेवर निवडून येईल असे वक्तव्य भाजपचे (BJP) जेष्ठ नेते तथा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Raosaheb Danve) यांनी प्रसार माध्यमांची बोलताना म्हटले आहे.
रावसाहेब दानवे म्हणाले की, महाराष्ट्रात आम्ही 45 प्लस जागांवर जिंकणार आहोत. जरांगे यांचा लोकसभेला परिणाम नाही. विधानसभेला ते लढणार असे जरांगेंनी सांगितल्याचे रावसाहेब दानवे यांनी म्हटले.
सगे सोयऱ्यांना आरक्षण देण्याची अंमलबजावणी झाली नाही तर सगळ्या जातीच्या लोकांना एकत्र घेऊन मी विधानसभेची निवडणूक लढणार आहे. राज्यातील 288 जागांवर उमेदवार देणार आहे, असे त्यांनी म्हटले. तसेच लोकसभेच्या निवडणुकीत मराठा एक झाला. मोदींना गोधड्या घेऊन महाराष्ट्रात यावे लागले. चार पाच नेत्यांमुळे मोदींवर ही वेळ आली, असेही त्यांनी म्हटले. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.