21 C
New York

Sanjay Raut : शिंदे तेव्हा कुणालाच नको होते, राऊतांचा नवा दावा

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीतील (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यातील मतदान उद्या होत आहे. प्रचार थांबला असला तरी सत्ताधारी आणि विरोधकांत आरोप प्रत्यारोप सुरू आहे. दोन्ही बाजूच्या नेत्यांकडून नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) मुख्यमंत्री करण्यासाठी आम्ही तयार होतो पण त्यांची आपापसात चर्चा झाली, असे शरद पवार (Sharad Pawar) यांनी म्हटले होते, त्यांच्या याच वक्तव्यावर खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आणखी एक धक्कादायक खुलासा केला. एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्यासाठी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांचा विरोध होता असा दावा संजय राऊत यांनी केला.

संजय राऊत पुढे म्हणाले, शरद पवारांनी जे प्रफुल पटेल यांच्याबद्दल सांगितलं ते गौप्यस्फोट नसून उघड सत्य आहे. शरद पवार राहुल गांधी यांच्याविषयी मी इतकं सांगेल की या दोघांचही एकमत होतं. त्यांचा एक मत अस होतं की या सरकारचं नेतृत्व असं असावं की त्या प्रत्येक घटकाला मान्य असावं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी नको. आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगायला सर्वात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील पुढे होते. त्यांचं म्हणणं होतं आम्ही सिनिअर आहोत आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही. इतकंच कशाला 2019 मध्ये सुद्धा शिवसेना भाजपमध्ये वाद झाला होता तो मुख्यमंत्रि‍पदावरूनच झाला होता.

संजय राऊत म्हणाले, तेव्हा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकनाथ शिंदे यांचीच निवड झाली होती आणि शिवसेनेकडून त्यांचं नाव पुढे गेलं होतं. परंतु भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांनी आम्हाला निरोप पाठवला होता, की दिल्लीचा निर्णय काय येईल तो आम्हाला माहिती नाही परंतु आम्हाला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून चालणार नाहीत. ही भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांची तेव्हाची भूमिका होती. शिंदे यांचा वकुब नव्हता, शिंदे यांचा कामाचा अनुभव कमी होता, शिंदे यांच्या कामाची पद्धत पैसा फेको तमाशा देखो अशी असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते.

संजय राऊत म्हणाले, राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं हे भाजप आणि राष्ट्रवादीमधल्या लोकांची भूमिका नव्हती. फक्त पैशांचा व्यवहार आणि व्यापार करणे हे नेतृत्व नाही ही भारतीय जनता पार्टीची भूमिका होती. हे सगळं महाविकास आघाडी होण्याच्या आधीची गोष्ट आहे. शिंदे चालणार नाहीत पण आम्ही बोलत होतो की विधिमंडळ पक्ष नेते म्हणून त्यांची निवड होती म्हणून कदाचित त्यांची निवड होऊ शकते. भाजपचे सीनियर नेते सगळ्यांचच असं म्हणणं होतं की आम्हाला एक अनुभवी नेता पाहीजे, असे संजय राऊत म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img