देशात मे महिन्यात कडाक्याच्या उन्हाळ्याने नागरिक (Monsoon Arrival Update) हैराण झाले आहेत. तापमान प्रचंड वाढले आहे. उत्तर भारतात तर तापमान ४७ अंशांपर्यंत पोहोचले आहे. येथील राज्यात हवामान विभागाने उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे. नागरिकांनी घरातच रहावे अशा सूचना दिल्या आहेत. या उष्णतेतून कधी सुटका होणार याची वाट नागरिक पाहत असतानाच दिलासा देणारी बातमी आली आहे. मान्सून आज अंदमानात दाखल होत आहे. केरळात ३१ मे रोजी मान्सून दाखल होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली.
उन्हाने घामाघूम झालेल्या सर्वांसाठी चांगली बातमी आहे. हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. मान्सून १९ मे रोजी अंदमानमध्ये दाखल झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांना लगबगीने शेतीच्या कामांना लागावे लागणार आहे. मान्सून ३१ मे रोजी केरळमध्ये दाखल होणार आहे. तसेच महाराष्ट्रात जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात दाखल होणार आहे. राज्यात गेल्या काही दिवसापासून उकाडा वाढला आहे. त्यामुळे मान्सूनच्या आगमनाची सर्वच जण आतूरतेने वाट पाहत आहेत. पाऊस आल्यास नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
1 जूनपासून बदलणार बैलगाडा शर्यतीचा ‘हा’ नियम
Monsoon Arrival Update हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला
नैऋत्य मान्सूनची वाट मे महिना सुरु झाला म्हणजे सर्व जण पाहतात. यंदा मान्सून वेळेआधी अंदमान निकोबार बेटांमध्ये येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले होते. आयएमडीने १९ मे ही तारीख अंदमानमधील मान्सूनच्या आगमानाची दिली गेली होती. त्यानुसार अंदमान, मालदीव, कोमोरिनच्या काही भागात दाखल झाला आहे. बंगालच्या उपसागराच्या काही भागात मान्सून पोहचला आहे. मान्सून दाखल झाल्यामुळे अंदमानमध्ये पाऊस सुरु झाला आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख के एस होसाळीकर यांनी यासंदर्भात ट्विट केले आहे. दरवर्षी अंदमानमध्ये २२ मे पर्यंत मान्सून दाखल होतो.
Monsoon Arrival Update केरळमध्ये दहा दिवसांत पोहचणार
मान्सून अंदमान निकोबारमध्ये दाखल झाल्यानंतर आता त्याची वाटचाल केरळकडे सुरु होणार आहे. अंदमानमधून नैऋत्य मोसमी वाऱ्यांना केरळपर्यंत पोहचण्यासाठी दहा दिवस लागतात. ३१ मे पर्यंत जर मान्सूनची वाटचाल अशीच राहिली तर केरळमध्ये दाखल होणार आहे. मान्सूनपूर्व पाऊस केरळ, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल या भागात होणार आहे. 19 आणि 20 मे रोजी या राज्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. त्यामुळे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. केरळमध्ये नैऋत्य मान्सून ३१ मे रोजी पोहोचण्याची शक्यता आहे. 22 मे रोजी केरळमध्ये काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. 21 मे 2024 रोजी 204.5 मिमी पेक्षा जास्त पावसाची शक्यता आहे.