19.7 C
New York

Loksabha Elections : उद्या राज्यातील अंतिम टप्प्यातील 13 मतदार संघात मतदान

Published:

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Elections) पाचव्या टप्प्यातील मतदान उद्याला पार पडणार आहे. निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात (Fifth Phase) देशात एकूण 49 लोकसभा मतदारसंघावर निवडणूक पार मतदान उद्या होणार आहे. त्यामध्ये राज्यातील 13 लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यामध्ये मुंबईतील (Election Mumbai) 6 मतदार संघाचा समावेश आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासाठी मुंबईवर आपली पकड ठेवण्याचे मोठे आवाहन असणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या राज्यातील सर्वात अंतिम टप्प्यात म्हणजे उद्या 20 मे रोजी होणाऱ्या पाचव्या टप्प्यात 13 लोकसभा मतदार संघावर मतदान पार पडणार आहे. यामध्ये मुंबईतील सहा लोकसभांसह ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, पालघर, नाशिक, धुळे, दिंडोरी या 13 मतदारसंघामध्ये निवडणुका होणार आहेत. त्यामुळे आता राज्यातील लोकसभा निवडणुकांची सांगता होण्यासाठी काही तास शिल्लक राहिले आहेत. पण या मतदान प्रक्रियेनंतर सर्वांना उत्सुकता असणार आहे ती 4 जूनच्या निकालाची. या निकालानंतर देशाचा कारभार कोणाच्या हातात जातो, हे ठरणार आहे.

नागपूर आणि पूर्व विदर्भातील मतदारसंघांमध्ये पहिल्या टप्प्यात सुरू झालेल्या निवडणुकीच्या प्रवासाची सोमवारी मुंबईतील सहा लोकसभा, ठाणे, भिवंडी, कल्याण डोंबिवली, पालघर आणि उत्तर महाराष्ट्रातील तीन जागांच्या मतदानाने म्हणजेच 13 लोकसभेच्या मतदानाने सांगता होईल. राज्यात सध्या तरी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत पाहायला मिळत आहे. पण काही मतदारसंघात एखाद्या अपक्ष उमेदवारामुळे तिहेरी लढतही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे निकालाच्या दिवशी म्हणजेच 04 जूनला कोणाचा कोणाची तुतारी वाजणार, कोणाची मशाल पेटणार, कोण पंजा दाखवणार, कोणाचे कमळ चिखलात फुलणार, कोण धनुष्यबाण मारणार आणि कोणाची वेळ योग्य ठरणार? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img