19.7 C
New York

Kiran Pavaskar : मुंबईतील मशिदींमधून उबाठामार्फत निवडणुकीचे फतवे

Published:

मुंबई

नरेंद्र मोदींना (Narendra Modi) पंतप्रधान न होण्यासाठी मुंबईत (Mumbai) पोस्टर्स लावून समाजात तेढ निर्माण करण्यात येत आहे. मुंबईतील ३७ मशिदींनी फतवे जारी केले असून निवडणुकीत (Loksabha Election) सहकार्यासाठी मुसलमानांवर दबाव टाकणे, बॅनर्स आणि पोस्टर्स लावणे, प्रचारासाठी मुल्ला मौलवींचा वापर करण्याचा गंभीर आरोप शिवसेना सचिव आणि प्रवक्ते किरण पावसकर (Kiran Pavaskar) यांनी उबाठावर (Uddhav Thackeray) केला. जातीय तेढ निर्माण करणाऱ्या संस्थे विरोधात शिवसेनेकडून जे. जे. मार्ग पोलिस ठाण्यात एफ.आय.आर दाखल करण्यात आला आहे.

गेले वर्षभरापासून संजय राऊत म्हणायचे की, निवडणुकीपूर्वी दंगली घडतील ते असे का बोलत होते? उबाठाच्या उमेदवाराच्या प्रचारात पाकिस्तानचा झेंडा, बॉम्बस्फोटातील आरोपी होते, त्यावर पोलीसांनी कारवाई करायला हवी. या सर्वांचे सूत्रधार संजय राऊत आणि उद्धव ठाकरे असून त्यांना परदेशातून पैसा आला का याची चौकशी व्हावी, अशी मागणी पावसकर यांनी केली. संजय राऊत विरोधात केंद्रीय निवडणूक आयोग आणि राज्य निवडणूक
आयोगाकडे तक्रार दाखल केली असल्याचे पावसकर म्हणाले.

दक्षिण मुंबईतील शिवसेनेचे मुंबादेवी संघटक रुपेश पाटील यांनी साबू सिद्धिक हॉस्पिटल, इमाम वाडा रोड, डोंगरी येथे पब्लिक कंप्लेंट सेंटर यांनी लावलेल्या आक्षेपार्ह पोस्टरबाबत पोलीसांत तक्रार दाखल केली आहे. या पोस्टर्समधून मशिद तोडले जात आहेत, दर्गे बंद केले जात असल्याचा मजकूर प्रसिद्ध करण्यात आला आहे. मात्र मशिद तोडले नाहीत, मदरसा बंद केले नाही तर मग असे बोर्ड का? ज्या गोष्टी घडल्याच नाही त्याचा बोर्ड लिहणे आणि उबाठाला सपोर्ट करणे यामागे एक षडयंत्र असल्याचा गंभीर आरोप किरण पावसकर यांनी केला. जामनगर हलाल मेमन जमात या संस्थेने उबाठाला सहकार्य करण्याचे पत्रक काढले आहे असे पावसकर म्हणाले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img