20.5 C
New York

IT Raid : आयकर विभागाचं धाडसत्र सुरुच

Published:

आयकर विभागाने शनिवारी बूट बनवणाऱ्या व्यावसायिकांवर मोठी कारवाई केली. आग्रा आणि दिल्लीसह उत्तर प्रदेशातील दोन जिल्ह्यांमध्ये व्यावसायिकांच्या घरावर आयकर विभागाने छापे टाकले. IT Raid आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यात तब्बल 40 कोटी रुपयांची रोकड मिळाली आहे. नोटांची मोजणी अपूर्ण आहे. उत्तर प्रदेशातील आग्रामधील तीन बुटांच्या व्यापाऱ्यांवर टाकलेल्या छाप्यात ही रक्कम मिळाली आहे. छाप्यादरम्यान बुटांच्या व्यावसायिकांच्या घरी चलनी नोटांचा ढीग मिळाला. त्यात 500 रुपयांच्या नोटा आहेत. या रक्कमेची मोजणी सुरू आहे. आयकर विभागाने नोटा मोजण्याची जबाबदारी बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर सोपवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बूट व्यापारी कर चुकवत असल्याची माहिती आयकर विभागाला मिळाली होती.

यानंतर दुपारी 3 वाजता आयकर विभागाचे अधिकारी तिन्ही कंपन्याच्या शोरूममध्ये पोहोचले आणि खरेदीसाठी आलेल्या लोकांना बाहेर काढून छापेमारी सुरू केली. येथे अजूनही छापेमारी सुरू असून अनेक कागदपत्रे देखील ताब्यात घेतली आहेत. आयकर विभागाचे पथक फाइल्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी करत आहे. आतापर्यंत 40 कोटी रुपयांची रोकड तासभर चाललेल्या या छाप्यात जप्त करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. पलंगाखाली नोटांचे बंडल लपवून ठेवले होते. हे पाहून अधिकारीही आश्चर्यचकित झाले आहेत.

इंडिया आघाडीच्या शपथविधीला या ठाकरेंचं निमंत्रण

दुसरीकडे, आयकर विभागाने शनिवारी अहमदाबाद आणि वडोदरा येथील माधव ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या ठिकाणी छापे टाकले. रिअल इस्टेट आणि सरकारी पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी प्रसिद्ध असलेल्या समूहाच्या दोन्ही शहरांतील २७ ठिकाणी आयकर विभागाने छापे टाकले. अधिकारी त्याच्या व्यवहारांची चौकशी करत आहेत. आयकर विभागाचे 50 हून अधिक अधिकारी छापे टाकत आहेत. आतापर्यंत 40 कोटी रुपये मोजले गेले आहेत. अजून बरीच रक्कम मोजणी राहिली आहे. या बेहिशेबी संपत्तीची चौकशी सुरु केली आहे. आयकर विभागाला या अधिकाऱ्यांबाबत माहिती मिळाली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडोदरा येथील सुभानपुरा येथील समूहाच्या कार्यालयावर छापे टाकण्यात आले होते. कर्नाटक, दिल्ली, मध्य प्रदेश, उत्तराखंड आणि महाराष्ट्रात अस्तित्व असलेल्या माधव ग्रुपची 2010 मध्ये स्थापना झाल्यापासून चौकशी सुरू आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img