23.1 C
New York

Heavy Rain : चिपळूणमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस

Published:

चिपळूण

हवामान विभागाने विदर्भ, मराठवाडा, सहकोकणात वादळी वाऱ्यासह (Heavy Rain) पावसाचा इशारा दिला होता. कोकणातील चिपळूण (Chiplun) मध्ये रविवारी ढगफुटीसदृश्य (Cloudburst) पाऊस झाल्याने चिपळूण मधील नदी नाल्यांना पूर आल्याची परिस्थिती निर्माण झाली होती. या ढगफुटी सदृश्य पावसामुळे उष्णतेमुळे हैराण झालेल्या कोकण वासियांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

राज्यात अनेक ठिकाणी उष्णतेत वाढ झाल्याने नागरिक हैराण आहे. तर काही ठिकाणी अवकाळी वाऱ्यासह पावसाची हजेरी सुरू आहे. मे महिन्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत असताना या भागातील नद्या दुथडी भरुन वाहत आहेत. सह्याद्री भागातील गावांमध्ये पडलेला मुसळधार पाउस चर्चेचा विषय बनला आहे. मुसळधार पावसामुळे नद्या प्रवाहित झाल्यामुळे गावातील पुलाचे काम करण्यासाठी आणलेले साहित्य देखील या पाण्याच्या प्रवाहातून वाहून गेले.जुलै मध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो त्या प्रमाणात पाऊस इथल्या ग्रामस्थांनी मे महिन्यात अनुभवला. या गावातील पाण्याने तुडुंब भरुन गेलेली शेतं आणि दुथडी भरुन वाहणाऱ्या  नद्यांचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img