7.3 C
New York

Daksh Choudhary: कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला! कोण आहे दक्ष चौधरी?

Published:

शुक्रवारी (१७ मे) ईशान्य दिल्लीतील काँग्रेसचे उमेदवार कन्हैया कुमार (Kanhaiya Kumar) यांच्यावर निवडणूक प्रचारादरम्यान हल्ला झाला. एका व्यक्तीने कुमार यांच्या गळ्यात हार घालण्याच्या बहाण्याने कानशिलात वाजवली आणि त्यांच्यावर शाईही फेकली. या घटनेचा एक सध्या व्हिडिओ सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल होत आहे.


व्हायरल झालेल्या हल्ल्याच्या व्हिडिओमध्ये, एक व्यक्ती “कन्हैयाला मारण्यात येणार आहे असे म्हणताना ऐकू येत आहे. तो असे म्हणताच काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला तरुण, हातात हार घेऊन कन्हैयाजवळ येतो आणि अचानक कन्हैया यांच्या कानशिलात वाजवली. हल्ल्यानंतर, सदर व्हिडिओ गुन्हेगारांनी सोशल मीडियावर टाकला. ज्यात असे म्हटले की, “आम्ही त्याला धडा शिकवला आहे.” काँग्रेस नेता कन्हैया कुमारवर झालेला हल्ला पूर्वनियोजित होता. व्हिडिओ रेकॉर्डिंग करणाऱ्या व्यक्तीला “कन्हैयाला मारहाण केली जाईल” असे म्हणताना ऐकू येते. गुन्हेगारांचे चेहरे व्हिडिओत दिसत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्य हल्लेखोर दक्ष चौधरी (Daksh Choudhary), स्वतःला हिंदू रक्षक दलाचा अधिकारी आणि कट्टर ‘गौ रक्षक’ म्हणवतो. त्याचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत ज्यात तो कधी शस्त्रांसह तर कधी भाजप नेत्यांसोबत दिसत आहे. त्याने त्याच्या साथीदारासह, त्यांच्या कृतीबद्दल बढाई मारणारा व्हिडिओ पोस्ट केला. हल्लेखोर म्हणाला, “आम्ही कन्हैया कुमारला प्रत्युत्तर दिले, ज्याने ‘भारताचे विभाजन होईल’ आणि ‘अफजल, आम्हाला लाज वाटते, तुझे मारेकरी जिवंत आहेत’ अशा घोषणा दिल्या. “आमच्यासारखे लोक जिवंत आहेत तोपर्यंत कोणीही भारताचे विभाजन करू शकत नाही,” असे हल्लेखोराने पुढे सांगितले. त्याचा साथीदार पुढे म्हणाला, “आम्ही त्याला दिल्लीत येऊ देणार नाही. तो भारतीय जवानांना बलात्कारी म्हणत त्यांची बदनामी करतो.” व्हिडिओचा शेवटला दोघेही “भारत माता की जय,” “भारतीय सेना झिंदाबाद,” “गौमाता की जय” आणि “जय श्री राम” अशा घोषणा देत होते.

चौधरी यांच्यावर यापूर्वी गुन्हा दाखल करण्यात आले होते. चौधरी यांच्यावर यापूर्वी चप्पल घालून मशिदीत घुसून जातीय तणाव निर्माण केल्याचा आरोप होता. मशिदीचे वातावरण बिघडवण्याचा कट रचल्याप्रकरणी त्याला गाझियाबाद पोलिसांनी फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. त्याच्या विरोधात डीसीपी ट्रान्स हिंडन आयुक्तालय गाझियाबाद यांनी आयपीसी कलम 151A, 295, 295A, 323, 504 आणि 506 अंतर्गत एफआयआर नोंदवला होता. व्हायरल झालेल्या एका फोटोमध्ये ते भाजप खासदार मनोज तिवारी यांच्यासोबत दिसले होते, ज्यामुळे तिवारीच्या सहभागावर संशय निर्माण झाला होता.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img