21 C
New York

Rashmika Mandanna: रश्मिका या व्हिडिओमुळे ट्रोल

Published:

नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) नेहमीच आपल्या लूकमुळे चर्चेत असते. तिने नुकतच अटल सेतूवर केलेल्या व्हिडीओनंतर राजकीय वातावरण भलतंच तापलं आहे. या व्हिडिओमुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात आहे. रश्मिकाने बनवलेल्या व्हिडिओच्या माध्यमातून तिचा राजकीय कल उघडकीस झाला असे अनेकांचे म्हणणे आहे .

रश्मिकाने हा व्हिडिओ ‘X’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला. यामध्ये ती अटल सेतूचं कौतुक करताना दिसत आहे. रश्मिका या व्हिडिओमध्ये म्हणाली, “जर तुम्ही पूल बघत असाल तर डोळे नीट उघडा. मुंबई ट्रान्स हार्बर लिंक हा भारतातील सर्वात मोठा सागरी पूल आहे. 6 लेन असलेला हा 22 किलोमीटर लांबीचा पूल आहे. यामुळे दोन तासांचा प्रवास अवघ्या 22 मिनिटांत पूर्ण होतो. विश्वास बसत नाही ना. असे घडेल याची काही वर्षांपूर्वी कोणी कल्पनाही करू शकत नव्हतं’ .’ एवढेच नव्हे तर पुढे रश्मिकाने मोदी सरकारचे समर्थन करत अटल सेतूचे कौतुक केले. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिच्या या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिल्यावर तर वाद चांगलाच पेटला आहे.

मात्र रश्मिकाने शेअर केलेल्या या व्हिडीओमुळे तिचे चाहते नाराज झाले आहेत. सध्या तिच्यावर टीकेचा भडिमार होत आहे. तिने मोदी सरकारला समर्थन देत हि व्हिडिओ बनवली. त्यामुळे कंमेंट्सचा पाऊस पडत आहे. एकाने कंमेंट केली की ‘ॲनिमलसारखा चित्रपट कर, आम्ही तो पाहू आणि हिट करू. पण अशा जाहिराती करू नकोस’ असे त्याने म्हटले. ‘ प्रिय रश्मिका, पुल आणि पुतळ्यांसह, मणिपूर हिंसाचारावरही तुमची जाहिरात पाहायला आवडेल. मणिपूरला उर्वरित भारताशी जोडूया?’ अशी कमेंट एका युजरने केली.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img