21 C
New York

Siddharth Jadhav: कान्स फेस्टिव्हलमध्ये झळकला मराठी चित्रपट…

Published:

सध्या ‘कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४’ची (Cannes Film Festival 2024) जोरदार चर्चा सुरू आहे. हॉलिवूड-बॉलीवूडपासून ते मराठी सिनेसृष्टीमुळे कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२४ चांगलाच चर्चेत आहे. अशातच मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवने (Siddharth Jadhav) आपल्या अभिनय आणि जबरदस्त विनोदी शैलीच्या जोरावर मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतो.

मराठी सिनेसृष्टीसोबतच बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्येही सिद्धार्थ जाधवने आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. खरंतर प्रत्येक कलाकार आपल्या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा व्हावी, अशी मनात इच्छा बाळगतो. अशातच हिंदीसह मराठी सिनेसृष्टी आपल्या अभिनयनाची छाप उमटवणारा सिद्धार्थ जाधवच्या एका मराठी चित्रपटाची आता परदेशात स्क्रिनिंग होणार आहे.

‘इमरजन्सी’ चित्रपट रिलीझ होणार का नाही?


जगभरातील अनेक चित्रपटांची स्क्रिनिंग कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये होते. यामध्ये मराठी चित्रपटांचाही समावेश आहे. अद्याप सिद्धार्थ जाधवचा ‘हजार वेळा शोले पाहिलेला माणूस’ चित्रपट रिलीज झालेला नाही. मात्र प्रदर्शनापूर्वीच चित्रपटाचे कौतुक होत आहे. नुकतंच सिद्धार्थने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत चाहत्यांना चित्रपटाबद्दल माहिती दिलेली आहे.


हा चित्रपट कान्स फिल्म फेस्टिव्हल १६ मे आणि १९ मे रोजी दाखवण्यात येणार आहे. प्रेक्षकदेखील या चित्रपटाची आतुरतेने वाटत बघत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचं स्पेशल स्क्रिनिंग मुंबई फिल्म फेस्टिवलमध्ये करण्यात आलं होत. लवकरच सिद्धार्थ ‘ये ये रे पैसा ३’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img