Loksabha Election : महाराष्ट्रात 13 मतदारसंघांत निवडणूक
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) महाराष्ट्रातील पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार शनिवारी सायंकाळी ५ वाजता संपला. या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबईसह १३ मतदारसंघांमध्ये सोमवारी २० मे रोजी मतदान होत आहे.
Loksabha Election : शेवटच्या दिवशी ठाकरेंच्या तीन सभा
लोकसभेच्या महाराष्ट्रातील ४८ जागांसाठी पाच टप्प्यात निवडणुका घेण्यात आल्या आहेत. पाचव्या व अंतिम टप्प्यातील मतदान सोमवारी होणार असल्याने शनिवारी १८ मी रोजी सायंकाळी प्रचाराची सांगता झाली. शेवटच्या दिवशी महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या मुंबईत विक्रोळी, दादर आणि काळाचौकी येथे सभा झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुक्रवारी शिवाजी पार्क येथे झालेल्या सभेला उद्धव ठाकरे यांनी या सभांमधून उत्तर दिले.
हेही वाचा : पाचव्या टप्प्यात 227 कोट्यधीश निवडणुकीच्या रिंगणात
महयुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे सभा झाली. मुंबईत महायुतीच्या उमेदवारांनी शेवटच्या दिवशी प्रचारफेऱ्यांवर भर दिला. २० मे रोजी मुंबईतील दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर मुंबई, उत्तर मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि वायव्य मुंबई या सहा मतदारसंघांसह ठाणे, कल्याण, भिवंडी, पालघर, नाशिक, दिंडोरी, धुळे या १३ मतदारसंघांत मतदान होत आहे.
Loksabha Election : ८ मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार
महाआघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेच्या दृष्टीने या टप्प्यातील मतदारसंघ महत्वाचे आहेत. या टप्प्यातील १३ पैकी ८ मतदारसंघांत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. दिंडोरीतून केंद्रीय मंत्री भारती पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर दक्षिण मुंबईतून शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत, दक्षिण मध्य मुंबईतून शिंदे गटाचे राहुल शेवाळे नाशिकमधून शिंदे गटाचे हेमंत गोडसे या विद्यमान खासदारांचे अस्तित्व पणाला लागले आहे.