22.3 C
New York

Loksabha: मुंबईमध्ये हायव्होल्टेज ड्रामाना सुरुवात, कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटप ?

Published:

जसजसा मुंबईमधील मतदानाचा (Loksabha) दिवस जवळ येत आहे, तसे मुंबईमधले राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असल्यातरी पडद्यामागच्या घडामोडींना आता वेग आला आहे. काल एका बाजूला महायुतीचे राज ठाकरे (Raj thakcrey) आणि नरेंद्र मोदी (Narendra Modi) तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या सभांमुळे सहाही मतदारसंघातील राजकीय वातावरण तापले होते. यामध्येच ठाकरे गटाने मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मिहीर कोटेचा (Mihir Kotecha) यांच्या कार्यालयाची तोडफोड केल्याने तणावात चांगलीच भर पडली.

मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटले जात असल्याचा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला असून, तुमचे काळे धंदे बंद पाडू असा इशारा कोटेचा यांनी दिला आहे. त्याचे पडसाद आजही उमटण्याची चिन्हे असून महाआघाडीची बैठक आटोपताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कोटेचा यांच्या कार्यालयात धाव घेत त्यांची भेट घेतली. असे टीव्ही 9 ने वृत्त दिले.

शुक्रवारी रात्री ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील आणि मिहीर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटले जात असल्याचा आरोप करत ठाकरे गटाने आंदोलन सुरू केले. कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांशी बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीमध्ये झाले आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी कोटेचा यांच्या कार्यालयात घुसून तोडफोड केल्याचे वृत्त आहे. भाजपच्या वॉर रूममध्ये पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला होता. मुंबई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सौम्य लाठीमार केल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. मुंबई पोलिस आणि निवडणूक अधिकारीदेखील या ठिकाणी दाखल झाले होते.

मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयात पैसे वाटले जात होते. आमच्या लोकांनी पोलिसांना फोन केला पण पोलिस आले नाहीत. या प्रकरणाचे फुटेजही समोर आले आहे. त्याकडेही नीट पाहावे. निवडणूक आयोग आपले काम करत नसल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img