4.1 C
New York

Swati Maliwal Case : केजरीवालांचा पीए विभव कुमारला अटक

Published:

आम आदमी पक्षाच्या (आप) खासदार स्वाती मालीवाल यांच्यासोबत झालेल्या (Swati Maliwal Case) कथित मारहाण प्रकरणी दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये विभव कुमारचे नाव आहे. आता याप्रकरणी त्याची अधिक चौकशी केली जाणार आहे.स्वाती मालीवाल यांचा विनयभंग केल्याप्रकरणी अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांचे पीए विभव कुमार (Vibhav Kumar) यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी जाऊन देखील दिल्ली पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. विभव कुमार यांचं नाव दिल्ली पोलिसांच्या एफआयआरमध्ये असून चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतल्याचं समजतंय.

Swati Maliwal Case केजरीवालांचा पीए विभव कुमारला अटक

दिल्ली पोलिसांनी विभव कुमारला मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानातून अटक केली आहे. त्यांना सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात नेण्यात आले आहे. विभव कुमार, त्यांना माध्यमातून एफआयआरची माहिती मिळाली. त्याचबरोबर विभव कुमारनेही ईमेलद्वारे पोलिसांकडे तक्रार केली आहे. दिल्ली पोलिसांनी त्याच्या तक्रारीची दखल घ्यावी, असे आवाहन विभवने केले आहे. आपल्याला कोणतीही नोटीस मिळाली नसल्याचेही विभव कुमार यांनी म्हटले.

गेल्या दोन दिवसांपासून विभव कुमार यांचा शोध घेतला जात होता. आज ते केजरीवाल यांच्या निवासस्थानी सापडले. दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री केजरीवाल यांच्या निवासस्थानाहून विभव कुमार यांना ताब्यात घेतलं आहे. त्यांना दिल्लीतील सिविल लाइन्स पोलीस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आलं आहे. विभव कुमार यांचं म्हणणं आहे की, त्यांना माध्यमांमधून एफआयआरबाबत माहिती मिळाली. पोलीस ठाण्यात विभव यांचे वकीलही गेले आहेत. मात्र, दिल्ली पोलिसांनी त्यांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला आहे. यावेळी वकील आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली आहे.

हायकोर्टाच्या इमारतीसाठी जमीन द्या सुप्रीम कोर्टाचे आदेश

आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक केली आहे. नुकतेच काही सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यामध्ये मालिवाल या पोलिसांनाच अरेरावी करताना, नोकरी घालविण्याची धमकी देताना व आरामात चालताना दिसत आहेत. यामुळे एकूणच या प्रकरणाभोवती संशयाचे ढग निर्माण होऊ लागले आहेत. मालिवाल यांनी गंभीर आरोप केल्याने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Swati Maliwal Case स्वाती मालीवाल यांच्या मेडिकल रिपोर्ट्समधून खुलासा

स्वाती मालीवाल यांनी विभव कुमार यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. स्वाती मालीवाल यांचं म्हणणं आहे की, जेव्हा त्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी पोहोचल्या त्यावेळी त्यांच्यासोबत विभव कुमार यांनी गैरवर्तन केलं आणि त्यांच्यासोबत मारहाणही करण्यात आली होती. स्वाती मालीवाल यांच्या तक्रारींच्या आधारे दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला आहे. एफआयआरनंतर एम्समध्ये स्वाती मालीवाल यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ज्या रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आलं आहे की, स्वाती डाव्या पायावर आणि उजव्या डोळ्याखाली जखमेच्या खुणा आहेत. स्वातीनं डोकेदुखी आणि मान ताठ असण्याचीही तक्रार केली आहे.

Swati Maliwal Case राघव चढ्ढा दिल्लीला परतले

दुसरीकडे भाजपने शनिवारी पत्रकार परिषदेत स्वाती मालीवाल यांचा मुद्दा उपस्थित करत आम आदमी पार्टी विभव कुमार यांना संरक्षण देत असल्याचा आरोप केला. दिल्लीत राजकीय घडामोडी बदलत असताना राघव चढ्ढा लंडनहून परतले असून त्यांनी शनिवारी मुख्यमंत्री केजरीवाल यांचे निवासस्थानही गाठले.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img