10.3 C
New York

IPL 2024 : BCCIने घातली हार्दिक पांड्यावर बंदी

Published:

मुंबई

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा यंदाच्या आयपीएलमधील (IPL 2024) दहावा पराभव लखनऊ सुपर जाएंटस विरुद्ध झाला. लखनऊ सुपर जाएंटसनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 6 विकेटवर 214 धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सनं 6 विकेटवर 196 धावांपर्यंत मजल मारली. यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स (MI)च्या संघानं फारशी चांगली कामगिरी केली नाही. त्यात संघाचा पराभवाता पाढा पुन्हा गिरवला गेला आणि क्रिकेटरसिकांची आणखी एकदा निराशा झाली. शुक्रवारी लखनऊच्या संघाविरोधात खेळत असताना मुंबईच्या संघाच्या घरच्याच मैदानावर अर्थात वानखेडे स्टेडिमवर 18 धावांनी पराभव झाला. एकिकडे संघ पराभूत झालेला असतानाच दुसरीकडे यंदाच्या वर्षी हार्दिक पांड्याच्या(Hardik Pandya) हाती गेलेल्या कर्णधारपदावरही टीकेची झोड उठवण्यात आल्याचं पाहायला मिळालं.

IPL 2024 सामन्यातील मानधनाची 50 टक्के रक्कम दंड

सामन्यादरम्यान कोड ऑफ कंडक्ट अर्थात सामन्यातील शिष्ठाचार मोडल्यामुळं त्याच्यावर ही कारवाई करण्यता येत असल्याची माहिती समोर आली आहे. हार्दिक ‘स्लो ओवर रेट’साठी दोषी असल्याचं आढळलं असून, यंदाच्या पर्वात त्याच्याकडून हीच चूक तिसऱ्यांदा घडली, ज्यामुळं त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली. फक्त हार्दिकच नव्हे तर, इम्पॅक्ट प्लेअरसह संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये असणाऱ्या इतर खेळाडूंनाही 12 लाखांचा दंड किंवा सामन्यातील मानधनाची 50 टक्के रक्कम दंड स्वरुपात भरावी लागणार आहे. मात्र, आयपीएलमध्ये असा नियम आहे की जर कोणताही कर्णधार स्लो ओव्हर रेटसाठी तीनदा दोषी आढळला, तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी घातली जाते आणि हार्दिक पांड्याबाबतही असेच झाले.

सामन्याआधी टॉस होणार नाही? BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत..

IPL 2024 स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे एका सामन्याची बंदी

आता हार्दिक पांड्यावरील ही बंदी आयपीएल 2025 च्या पहिल्या सामन्यात लागू होईल, कारण या हंगामात मुंबई इंडियन्सचे कोणतेही सामने शिल्लक नाहीत. हार्दिक पांड्या पुढच्या हंगामात मुंबईचा भाग नाही राहिला तरी देखील त्याच्यावर ही बंदी कायम राहील.आयपीएलनं जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, ‘आयपीएलच्या आचारसंहितेअंतर्गत हा त्याच्या संघाचा हंगामातील तिसरा गुन्हा होता, ज्यामुळे पांड्याला 30 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला पुढील सामन्यात खेळण्यावर बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय इम्पॅक्ट प्लेअरसह उर्वरित मुंबई इंडियन्स प्लेइंग इलेव्हनला देखील वैयक्तिकरित्या 12 लाख रुपये किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 50 टक्के, यापैकी जे कमी असेल, तेवढा दंड ठोठावण्यात आलाय. आयपीएल 2024 मध्ये स्लो ओव्हर रेटमुळे बंदीचा सामना करणारा हार्दिक पांड्या हा दुसरा कर्णधार आहे. त्याआधी बीसीसीआयनं दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतवरही स्लो ओव्हर रेट राखल्यामुळे एका सामन्याची बंदी घातली होती. या बंदीमुळे पंत आरसीबीविरुद्ध महत्त्वाचा सामना खेळू शकला नव्हता.

IPL 2024 हार्दिकला 3 सामन्यात 3 वेळा दंड ठोठावला

पहिल्यांदा – पंजाब किंग्स विरुद्ध12 लाखांचा दंड

दुसऱ्यांदा – लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध 24 लाखांचा दंड

तिसऱ्यांदा – पुन्हा लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 30 लाखांचा दं

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img