‘तारक मेहता का उलटा चष्मा’ (Taarak Mehta Ka Ulta Chashmah) या लोकप्रिय मालिकेत सोढीची भूमिका साकारणारा गुरुचरण सिंह (Gurucharan Singh) २२ एप्रिल पासून बेपत्ता होता. त्याच्या वडिलांनी २६ एप्रिल रोजी दिल्ली पालम पोलीस स्थानकात तक्रार नोंदवली. तेव्हापासून कंबर कसून दिल्ली पोलीस गुरुचरणचा शोध घेत आहेत. परंतु तब्ब्ल २५ दिवसांनी तो घरी सुखरुप परतला आहे. गुरुचरणच्या बेपत्ता होण्यावर चाहत्यांसह पोलीसदेखील चिंतेत होते. पोलिसांच्या चौकशीदरम्यान गुरुचरण म्हणाला,”दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो”.
घरी परतल्यावर पोलिसांनी चौकशीदरम्यान प्रश्न विचारला. त्यावेळी गुरुचरण म्हणाला,”मी दुनियादारी सोडून धार्मिक यात्रेला गेलो होतो. बरेच दिवस मी अमृतसरमध्ये थांबलो होतो. त्यानंतर लुधियानासारख्या अनेक शहरांमधील गुरुद्वारमध्ये थांबलो. त्यानंतर पुन्हा आपल्या घरी जावं, कुटुंबिय आणि वडिलांकडे जावं, असं मला वाटलं. त्यामुळे मी पुन्हा घरी येण्याचा निर्णय घेतला”. सध्या पोलीस गुरुचरणची चौकशी करत आहेत.
होर्डिंग दुर्घटनेत अभिनेत्याच्या मामा-मामीचा मृत्यू
गुरुचरण सिंह 22 एप्रिल 2024 रोजी आपल्या घरुन मुंबईला जाण्यासाठी निघाला होता. पण तो मुंबईत पोहोचला नाही. त्यानंतर २६ एप्रिल २०२४ रोजी त्याच्या वडिलांनी आपला मुलगा बेपत्ता झाल्याप्रकरणी दिल्ली पालम पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अपहरणाअंतर्गत तक्रार दाखल केली आणि चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान समोर आलं की गुरुचरण 24 एप्रिलपर्यंत दिल्लीतच होता. त्यावेळी त्याचा मोबईल बंद झाला. मिळालेल्या माहितीनुसार अभिनेता लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे. मात्र नेटकरी संतप्त होऊन हा पब्लिसिटी स्टंट आहे का? असा प्रश्न विचारत आहेत.