लोकसभेच्या पाचव्या टप्प्यातील निवडणुकीच्या प्रचारासाठी आज शेवटचा दिवस आहे. आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) ठाण्यात महायुतीचे (Mahayuti) उमेदवार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांच्या प्रचारार्थ महायुतीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार निशाणा साधला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, काल झालेल्या जाहीर सभेत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi) देशाची पुढची दिशा काय असणार हे सांगितले आहे. मोदीजी देशात 10 वर्षात कोणती कोणती कामे झाली आणि पुढच्या 25 वर्षात काय होणार हे सांगण्यासाठी काल मुबंईत आले होते. हा मूलभूत फरक महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये आहे.
Devendra Fadnavis उद्धव ठाकरे यांना नकली बोललं की…
महायुतीचे नेते विकासावर बोलतात , महाराष्ट्राच्या हितासाठी बोलतात तर महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भाषणाची सुरुवात आणि शेवट शिव्यांनी होते. काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आमची शिवसेना आहे तर तुमची शिव्या सेना आहे. उद्धव ठाकरे यांना नकली बोललं की, मिरची झोंबली. तुमची वागणूकच तशी आहे. त्यांना ही निवडणूक दिल्लीतील वाटत नाही, तर त्यांना गल्लीतील निवडणूक वाटत आहे. अशी टीका त्यांनी यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंवर केली. पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरे तुम्ही फक्त बाळासाहेबांचे संपत्तीचे वारसदार आहे मात्र त्यांच्या विचारांचे वारसदार एकनाथ शिंदे आहे. तुम्हाला आता हिरवा ध्व्ज जवळचा वाटत आहे. यामुळे आता हळूहळू त्यांना शिवसेनेचा भगवा ध्वज फडकं वाटू लागेल कारण त्यांच्यावर हिरवं सावट आहे. असं देखील यावेळी फडणवीस म्हणाले.
लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीत मुस्लिम बेदखल
Devendra Fadnavis राज्यात महाविकास आघाडीला 48 जागा येतील
ही निवडणूक गल्लीची निवडणूक नाही. पुढील पाच वर्ष या देशाला कोण सुरक्षित ठेवू शकतो, कोण या देशाचा विकास करू शकतो हे ठरवणारी ही निवडणूक आहे. या निवडणुकीत आपण सैनिक म्हणून काम करत आहे. कारण जो या निवडणुकीत मोदींना निवडून देण्यासाठी काम करेल तो तो भारताचा सैनिक असेल असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.राज्यात महाविकास आघाडीला 48 जागा येतील असं उद्धव ठाकरे म्हणाले होते, त्यांचं कर्तृत्व मोठं आहे ते 49 जागाही निवडून आणतील असा टोलाही त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लावला. ठाणे लोकसभा हा महायुतीचा बालेकिल्ला आहे. यामुळे या निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीच्या उमेदवाराला जास्तीत जास्त मतांनी निवडनू द्या असा आवाहन देखील त्यांनी यावेळी केला.