21 C
New York

J. P. Nadda : भाजप स्वयंपूर्ण, संघाची गरज उरली नाही-नड्डा

Published:

नवी दिल्ली

भारतीय जनता पक्षाचा डोलारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मजबूत बांधणीवर उभा राहिलेला आहे. किंबहुना भाजपच्या उमेदवारांचा प्रचार करण्यापासून ते मतदारांना मतदान केंद्रापर्यंत आणणे, बूथ बांधणी करण्यापर्यंत संघाची भूमिका महत्वाची राहिली आहे. पण, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda)यांनी भाजप (BJP) आता स्वयंपूर्ण झाला आहे. त्याला संघाची गरज उरली नाही, असे वक्तव्य केले आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या मध्यावर नड्डा यांनी केलेल्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.नड्डा यांनी एका इंग्रजी दैनिकाला मुलाखत दिली. यात त्यांनी अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली.

अटल बिहारी वाजपेयी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या कार्यकाळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकारणातील भूमिका बदलत गेली आहे का, या प्रश्नावर जे. पी. नड्डा म्हणाले, भारतीय जनता पक्ष आता स्वयंपूर्ण झाला आहे. तो आपला कारभार स्वतंत्रपणे करतो आहे. सुरुवातीच्या काळात आम्ही कमकुवत होतो, विजयापर्यंत जाताना थोडे कमी पडत होतो. तेव्हा आम्हाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची गरज पडत होती. पण, आज आम्ही स्वयंपूर्ण झालो आहोत. आमचा पक्ष मोठा झाला आहे. आम्ही पक्षाचा कारभार स्वतः सांभाळतो आहोत, हा या दोन्ही कालखंडातील फरक आहे, असे नड्डा म्हणाले.

केजरीवालांचा पीए विभव कुमारला अटक

निवडणुकांच्या राजकारणात भाजपला आता संघाची गरज पडत नाही, हे अप्रत्यक्षरीत्या सांगताना नड्डा म्हणाले, “भाजप आता मोठा झाला आहे. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे. भाजप राजकीय संघटना आहे. तर आरएसएस वैचारिक शाखा आहे. आम्ही आमचे काम करतो, ते वैचारिक काम करतात. प्रत्येकाला ज्याची त्याची भूमिका आहे. जबाबदारी आहे,’ असेही नड्डा यांनी स्पष्ट केले.

J. P. Nadda भाजप आता संघावर बंदी आणेल – ठाकरे

जे. पी. नड्डा यांच्या या भूमिकेवर उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे, कि भाजप आता संघावर बंदी आणेल कि काय, अशी भीती वाटायला लागली आहे.

ताज्या बातम्या

spot_img

राजकीय

spot_img